महाराष्ट्र तापला, नागपूरमधील तापमान ४७ अंशावर
By admin | Published: May 20, 2015 05:17 PM2015-05-20T17:17:54+5:302015-05-21T08:32:10+5:30
उन्हामुळे राज्यातील वातावरण आता चांगलेच तापले असून नागपूरमध्ये बुधवारी दुपारी पारा थेट ४७ अंशावर पोहोचला.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० - उन्हामुळे राज्यातील वातावरण आता चांगलेच तापले असून नागपूरमध्ये बुधवारी दुपारी पारा थेट ४७ अंशावर पोहोचला. वर्धा, बुलढाणा या भागांमधील तापमानही ४५ अंशांवर पोहोचला आहे.
मे महिना उजाडताच राज्यातील तापमानाचा पारा दिवसेगणिक वाढत आहे. बुधवारी विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूरमध्ये आज दुपारी ४७ डिग्री, बुलढाण्यात ४६ डिग्री, चंद्रपुरमध्ये ४७.४ डिग्री तर वर्धा येथे ४७.२ डिग्री अंश सेल्सियस ऐवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हामुळे दुपारात घरातून बाहेर पडणे अवघड झाल्याचे नागपूरमधील रहिवाशांनी सांगितले. काही भागांमध्ये आता पाणीटंचाईची समस्याही निर्माण झाली आहे.