केडगावचे मंदिर अखेर खुले
By admin | Published: June 10, 2016 01:23 AM2016-06-10T01:23:30+5:302016-06-10T01:23:30+5:30
येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर अखेर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
केडगाव : येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर अखेर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
‘केडगावला मंदिराला कुलूप लावण्यावरून वाद’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये (दि. ३) सविस्तर वृत्त छापण्यात आले होते. पुजारी बाळासाहेब शेलार व केडगाव ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद उफाळला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शशिकांत चव्हाण यांनी ग्रामस्थ व पुजारी यांची सभा घेतली.
यामध्ये दोन्ही पक्षकारांनी आपापले मत मांडले. यानंतर चव्हाण यांनी सदर मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले राहील, असा आदेश दिला.
या वेळी पोलीस जितेंद्र पानसरे, विठ्ठल शेळके, माऊली शेळके केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयाचे केडगावच्या भाविकांनी स्वागत केले आहे. मंदिरात पूजा अर्चा, भजन, दिवाबत्ती, दर्शन नियमित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.