टेम्पोची एसटीला धडक, १७ वारकरी जखमी

By admin | Published: July 16, 2016 07:33 PM2016-07-16T19:33:21+5:302016-07-16T19:33:21+5:30

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना वारक-यांच्या टेम्पोची ट्रकला ओव्हरटेक करून समोर येणा-या एसटीला जोरदार धडक झाली़

Tempo stuck in ST, 17 injured in Warakari | टेम्पोची एसटीला धडक, १७ वारकरी जखमी

टेम्पोची एसटीला धडक, १७ वारकरी जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
टेंभुर्णी, दि. 16 - आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना वारक-यांच्या टेम्पोची ट्रकला ओव्हरटेक करून समोर येणा-या एसटीला जोरदार धडक झाली़. या अपघातात १७ वारकरी जखमी झाले असून जखमींपैकी गंभीर तिघांना इंदापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सर्व जखमी नगर जिल्ह्यातील आहेत. हा अपघात टेंभुर्णी-पंढरपूर मार्गावरील अकोले बु़ (ता़ माढा) गावच्या शिवारात घडला.
 
अधिक माहिती अशी, चालक शेळके हे टेम्पोने (एम़ एच़ ०४ सी़ ९१३१) वारकरी घेऊन पंढरपूरहून अहमदनगरकडे निघाला होता. तो अकोले बु़ गावच्या हद्दीत आला असता समोरील मालट्रकला (एम़ एच़ २३ - ५३९९) ओव्हरटेक करीत होता. दरम्यान समोरुन पंढरपूरकडे जाणा-या एसटीमुळे (एम़ एच़ २० बी़ एल़ २८४४) टेम्पो ओव्हरटेक होऊ शकला नाही. त्यामुळे तो सरळ बसवर जाऊन आदळला, तसेच मालट्रकचीही टेम्पोस पाठीमागून धडक बसली. मोठा अपघात होणार हे लक्षात आल्याने बस चालक व ट्रक चालकाने वेग कमी करीत सावरले. त्यामुळे टेम्पो रस्त्यावरून खाली पडता-पडता थोडक्यात बचावला, परिणामी मोठा अनर्थ टळला.
 
या अपघातात दादासाहेब गवळी (वय २५), सुशीलाबाई आप्पासाहेब दहातोंडे (वय ५५), नानासाहेब दशरथ धुमाळ (वय ५०), बबुबाई गणपत गायके (वय ६०), माधव नेटके (वय ७०), गोदाबाई रामदास गुंड (वय ६०) हे सर्व रा़ चांदा, ता़ नेवासे, रंजना कोरडे (वय ४०), सुगरणबाई बाळासो नगरे (वय ६५), निरा माणिक काटे (वय ६५), कारभारी नामदेव कोरडे (वय ६०), मंदाबाई चंद्रभान सिरसाट (वय ५५) हे सर्व़ रा़ कडगाव, ता़ पाथर्डी, झांबुबाई पालवे (वय ६५), जांबुबाई सिरसाट (वय ६०) या दोघी रा़ पाथर्डी, दत्तात्रय वामन फुंदे (वय ७६, रा़ लोहारवाडी, ता़ नेवासा), माणिक भाऊसो वाघ (वय ३२, रा़ कवठा, ता़ नेवासा) हे जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोनि के़ एऩ पाटील, फौजदार विक्रम गायकवाड, पोहेकॉ अशोक बाबर, शहाजी शेलार, दत्ता वजाळे, पोहेकॉ भारत नरसाळे, हनुमंत जाधव, घोडके आदी घटनास्थळी दाखल झाले़ अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती़ मात्र पोलिसांनी अपघातातील वाहने बाजुला सारून नंतर वाहतूक सुरळीत झाली़ जखमींना टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
 
जखमींवर डॉ़ मनीष पांडे, आरोग्य सेविका सरिता बंडगर, मनीषा बैरागी, आरोग्य सेवक कलासागर घंटे, रामचंद्र साळुंके, सतीश लोंढे यांनी उपचार केले़ उपचारानंतर जखमींना अहमदनगर येथे रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले़ गंभीर तिघांना मात्र इंदापूर येथे हलविण्यात आले़ जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी रणजित देशमुख यांनी प्रयत्न केले़ नेवासेचे भाजपा आ़ बाळासाहेब मुरकुटे यांनीही दर्शन घेऊन जाताना जखमींची टेंभुर्णी आरोग्य केंद्रात जाऊन विचारपूस केली.

Web Title: Tempo stuck in ST, 17 injured in Warakari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.