पारा घेणार उसळी, उष्णतेच्या लाटेचा इशारा; कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:59 AM2023-03-09T05:59:40+5:302023-03-09T06:00:04+5:30

मुंबई-कोकणपट्ट्यात तर उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

temprature to rise heat wave warning The maximum temperature will increase by 3 to 4 degrees maharashtra weather department | पारा घेणार उसळी, उष्णतेच्या लाटेचा इशारा; कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढणार

पारा घेणार उसळी, उष्णतेच्या लाटेचा इशारा; कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढणार

googlenewsNext

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पारा थोडा घसरला असला तरी येत्या काही दिवसांत पारा उसळी घेणार असून, तब्बल तीन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यत: मुंबई, कोकण, गोवा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दिवसाच्या कमाल तापमानात ही वाढ नोंदवली जाईल. मुंबई-कोकणपट्ट्यात तर उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पूर्णपणे साफ होईल आणि स्वच्छ वातावरण जाणवेल. विदर्भातील ११ जिल्ह्यांत मात्र ९ ते १० मार्च दरम्यान तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानाच्या तुलनेत एकूणात अंदाजे ६ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. १५ ते २० मार्च दरम्यान कदाचित एक ते दोन दिवस मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यांत किरकोळ पावसाची शक्यता आहे, असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

ढगाळ हवामान निवळले 
मुंबई शहर आणि उपनगरात उठलेल्या धुळीच्या वादळामुळे मंगळवारी सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्यात हवामानात झालेल्या बदलामुळे दोन दिवस मुंबईत ढगाळ वातावरण होते. बुधवारी हवामानात पुन्हा एकदा बदल झाले असून, ढगाळ हवामान निवळल्यानंतर आता उन्हाने उचल खाल्ली आहे.

Web Title: temprature to rise heat wave warning The maximum temperature will increase by 3 to 4 degrees maharashtra weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.