दहा माजी महापौरांचा एल्गार!

By Admin | Published: July 23, 2016 01:30 AM2016-07-23T01:30:48+5:302016-07-23T01:30:48+5:30

वेगवेगळ््या मार्गांनी हेल्मेटसक्ती करण्यात अपयश येत असलेल्या राज्य शासनाने ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही’

Ten former Mayor Elgar! | दहा माजी महापौरांचा एल्गार!

दहा माजी महापौरांचा एल्गार!

googlenewsNext


पुणे : वेगवेगळ््या मार्गांनी हेल्मेटसक्ती करण्यात अपयश येत असलेल्या राज्य शासनाने ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही’ असा नारा देत हेल्मेटसक्तीचा घाट घातला आहे. या सक्तीला पुण्यातील दहा माजी महापौरांनी विरोध दर्शविला आहे. हा निर्णय म्हणजे निर्बुद्धपणाचा आहे, अशी खरमरीत टीका करीत हेल्मेटसक्तीविरोधात एल्गार पुकारला आहे. तसेच या सक्तीला असलेला जनसामान्यांच्या भावनांचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणीही या सर्व महापौरांनी केली आहे.
शांतिलाल सुरतवाला, विठ्ठल लडकत, अंकुश काकडे, दत्ता एकबोटे, सुरेश शेवाळे, उल्हास ढोले-पाटील, दत्ता गायकवाड, बाळासाहेब शिरोळे, मोहनसिंग राजपाल, दत्ता धनकवडे यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्याची एक प्रत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आली आहे. रावते हे भविष्यात ड्रायव्हरकडे लायसन्स नाही, म्हणून मोटारीला पेट्रोल नाही. म्हणजे अपघात कमी होतील, अशी घोषणादेखील करतील, अशी उपरोधिक टीका या महापौरांनी केली.
पेट्रोल भरेपर्यंत हेल्मेट भाड्याने घ्यायचे. कदाचित पेट्रोल पंपचालकच हा जोड व्यवसाय म्हणून सुरू करतील, अशा शब्दात या हेल्मेटसक्तीचा माजी महापौरांनी समाचार घेतला आहे. बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळाल्याने रावते यांना काही तरी निर्णय घेऊन चमकोगिरी करायची आहे. पण, याचा थेट परिणाम शिवसेनेवर होणार आहे. दुसरे काही सुचत नसेल तर रावते यांनी राजकारणातून निवृत्त होऊन घरी बसावे, असा टोलाही या निमित्ताने या महापौरांनी रावते यांना लगावला आहे.
>पेट्रोल पंप बंद ठेवणार...
हेल्मेटसक्तीसाठी राज्य शासनाने घेतलेल्या हेल्मेट नसल्यास पेट्रोल नाही, या निर्णयाची कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी करणे शक्य नाही. वेळप्रसंगी सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पुणे पेट्रोल डीलर असोसिएशनने दिला आहे. असोसिएशनच्या सदस्यांशी चर्चा करून लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.हेल्मेट नसेल तर दुचाकीचालकांना पेट्रोल न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याचे काम पेट्रोल पंपचालकांवर टाकण्याऐवजी जनजागृती करण्याची अथवा अन्य पर्याय शोधण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार, नुसार विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालकांवर कारवाई केली जाणार असेल, तर ही आमच्यासाठी चिंताजनक बाब आहे. यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.

Web Title: Ten former Mayor Elgar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.