दहा तासांचा विशेष ब्लॉक
By admin | Published: February 19, 2017 03:07 AM2017-02-19T03:07:50+5:302017-02-19T03:07:50+5:30
ठाकुर्ली स्थानकातील प्लॅटफॉर्म व अन्य काही तांत्रिक कामांसाठी दहा तासांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या
मुंबई : ठाकुर्ली स्थानकातील प्लॅटफॉर्म व अन्य काही तांत्रिक कामांसाठी दहा तासांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील रविवारी हा ब्लॉक घेतला जाईल.
दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा मिळावा, या मागणीसाठी प्रवशांकडून उग्र आंदोलन करण्यात आले. त्यामुळे जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म, नवीन मार्ग टाकतानाच, कट-कनेक्शनची कामे केली जाणार होती. त्यामुळे या कामांसाठी आॅक्टोबर महिन्यात प्रत्येक रविवारी नऊ ते दहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला. अशाच प्रकारचा ब्लॉक हा ठाकुर्ली स्थानकातील होम प्लॅटफॉर्म आणि कट-कनेक्शनच्या कामासाठीही घेतला जाणार
आहे.
ठाकुर्ली स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी प्रवाशांना पादचारी पुलावरून यावे लागत असे. त्यामुळे बराच मनस्ताप सहन करावा लागत असल्याने, एक नंबर प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूलाही होम प्लॅटफॉर्म बनवण्याचा निर्णय घेतला. या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले असून, रुळांचे कट-कनेक्शनची काही कामे बाकी आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ब्लॉकची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
५० टक्के फेऱ्या रद्द
हा ब्लॉक २६ फेब्रुवारी किंवा ५ मार्च या दोन रविवारपैकी एका रविवारी घेण्यात येईल. ठाकुर्लीतील कामांसाठी जवळपास ५0 टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.