दहा आयएएस अधिका-यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:07 AM2017-11-29T06:07:07+5:302017-11-29T06:08:38+5:30
राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली.
मुंबई : राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली वित्त विभागात (लेखा व कोषागरे) करण्यात आली. वित्त विभागातील प्रधान सचिव (सुधारणा) आर.ए. राजीव यांना याच विभागात प्रधान सचिव (व्यय) या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी एस.व्ही.आर. श्रीनिवास हे माहिती तंत्रज्ञान विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांची बदली मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन सेलच्या संचालकपदी करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आतापर्यंत सांभाळत असलेले आर.डी. निवतकर हे मुख्य सचिव कार्यालयाचे नवे सहसचिव असतील. मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव असलेले एस.डी. मांढरे हे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. गुरसाल यांची नागपूर येथे मनरेगा मुख्यालयात आयुक्तपदी करण्यात आली आहे.