मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चर्चगेट येथील भाषणातील दहा मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 03:17 PM2017-10-05T15:17:23+5:302017-10-05T15:52:46+5:30
परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने आज संताप मोर्चा काढला होता.
मुंबई - परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने आज संताप मोर्चा काढला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना काही महत्वाचे मुद्दे मांडले.
- पुढच्या पाच-सहा महिन्यात मंदी वाढणार असे आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल म्हणतात. म्हणजे लोकांच्या नोक-या जाणार.
- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना मंत्रिपदावरुन काढलं.
- बुलेट ट्रेनला विरोध करणारा पहिला माणूस मी, बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे स्वस्त मिळतो.
- मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार पण बुलेट ट्रेनसाठी काढलेलं एक लाख कोटीचं कर्ज संपूर्ण देश फेडत बसणार, हे चालणार नाही.
- माझ्यासमोर उभ केलेलं गुजरातच्या विकासाच चित्र खोट होतं.
- विकास वेडा झालाय ही स्लोगन भाजपामधूनच आलीय.
- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत
आज रेल्वे मुख्यालयावर मनसेच्या विराट मोर्चानंतर मा.राजसाहेबांनी त्यांच्या भाषणात मांडलेले महत्वाचे मुद्दे #RajThackeray#mns#mumbaipic.twitter.com/6NNpRlpr3o
— MNS Tweets (@manaseit) October 5, 2017
- मोदी बोलतात धोरणांवर टीका करण म्हणजे देशाविरोधात बोलण, मला सांगा मोदी म्हणजे देश का ?
- निवडणूक आयोग, न्यायाधीश आणि संपादकांना मी विनंती करतो त्यांनी सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नये, सरकार दर पाचवर्षांनी बदलत असतात.
We have organised this rally peacefully.But,if there is no change in system of government then our next rally will not be peaceful:MNS Chief pic.twitter.com/h2VUkIEcjU
— ANI (@ANI) October 5, 2017
- लाईट घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच. केबल बंद करुन, वीज गायब करुन आमचा विरोधाचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.
- हा मोर्चा शांततेत निघाला पण पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही.