करमाळ्यात कंत्राटाचे आमिष दाखवत दहा लाखांची फसवणूक

By admin | Published: February 29, 2016 03:31 AM2016-02-29T03:31:46+5:302016-02-29T03:31:46+5:30

टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गाच्या चौपदरी कामासाठी खडी पुरवठा करण्याचे काम मिळवून देतो, असे सांगून सुप्रीम कंपनीच्या दोघा अधिकाऱ्यांनी १० लाख ५० हजार रुपये कमिशन घेऊन

Ten lakhs fraud by showing contractual lure | करमाळ्यात कंत्राटाचे आमिष दाखवत दहा लाखांची फसवणूक

करमाळ्यात कंत्राटाचे आमिष दाखवत दहा लाखांची फसवणूक

Next

करमाळा (सोलापूर) : टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गाच्या चौपदरी कामासाठी खडी पुरवठा करण्याचे काम मिळवून देतो, असे सांगून सुप्रीम कंपनीच्या दोघा अधिकाऱ्यांनी १० लाख ५० हजार रुपये कमिशन घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा करमाळा पोलिसांत शनिवारी दाखल झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक गणेश चिवटे यांनी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, टेंभुर्णी-जातेगाव चौपदरीकरणाचे काम सुप्रीम कंपनीकडून सुरू आहे. त्यात कंत्राट मिळवून देतो असे म्हणून मयूर आनम व नौशाद आलम यांनी फसवणूक केली.

Web Title: Ten lakhs fraud by showing contractual lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.