मंगळवेढ्यातील दहा जण तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार

By admin | Published: July 28, 2016 01:18 AM2016-07-28T01:18:13+5:302016-07-28T01:18:13+5:30

अवैध मटका चालविल्या प्रकरणी अनेकवेळा गुन्हा दाखल केल्यावरही न्यायालयात जामीनावर बाहेर येताच पुन्हा मटका चालवत असल्याप्रकरणी तब्बल दहा जणाना सोलापूर, पुणे, सांगली

Ten out of the Mangalwad, expat two years from three districts | मंगळवेढ्यातील दहा जण तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार

मंगळवेढ्यातील दहा जण तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार

Next
>- प्रविण गांडूळे, मंगळवेढा 
 
अवैध मटका चालविल्या प्रकरणी अनेकवेळा गुन्हा दाखल केल्यावरही न्यायालयात जामीनावर बाहेर येताच पुन्हा मटका चालवत असल्याप्रकरणी तब्बल दहा जणाना सोलापूर, पुणे, सांगली या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश सोलापूरचे पोलिस अधिक्षक  वीरेश प्रभू यानी जारी केले.
हद्दपार केलेल्यांची नावे अशी ; चंद्रकांत राजाराम घुले (घुलेगल्ली, मंगळवेढा), उमेश शंकर घुले (घुलेगल्ली मंगळवेढा), दादा गुलाब ढावरे (भीमनगर, मंगळवेढा), चंद्रकांत संभा नलावडे (आदर्शनगर मंगळवेढा), भीमराव नामदेव मुदगल (खंडोबा गल्ली मंगळवेढा), सिध्देश्वर द्यानोबा सलगर (शरदनगर, मंगळवेढा), श्रीकांत शुक्राचार्य निकम (डोंगरगाव, ता. मंगळवेढा), शिवाजी अशोक इंगळे (शरद नगर, ता.  मंगळवेढा),वरिष्ठ जालिंदर माने (ढवळस ता. मंगळवेढा), शिवाजी अंबादास पवार (शिवाजी नगर ता. मंगळवेढा जि. सोलापूर)
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, चंद्रकांत घुले व सिध्देश्वर सलगर हे प्रमुख आरोपी त्यांच्या चार- चार साथिदारांसह मिळून मंगळवेढा व परिसरात २०१३ पासून  मुंबई व कल्याण नावाचा अवैध मटका चालवित आहेत. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ते न्यायालयातून जामिनावर सुटल्यावरही पुन्हा त्यानी मटका व्यवसाय सुरु केला. त्याना वेळोवेळी अटक केल्यावरही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही.  त्यांच्य गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील लहान मुले व स्त्रियामध्ये दहशत निर्माण झाली आहे शिवाय कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे या दहा जणाना दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली.

Web Title: Ten out of the Mangalwad, expat two years from three districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.