विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती कलंडून दहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 06:13 AM2018-09-25T06:13:52+5:302018-09-25T06:14:30+5:30

लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करून त्याला वाजतगाजत निरोप देत असताना विसर्जन मिरवणुकीत बाप्पाची चौदा फुटी मूर्ती कलंडल्याची घटना चारकोपमध्ये रविवारी मध्यरात्री घडली.

 Ten people injured | विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती कलंडून दहा जण जखमी

विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती कलंडून दहा जण जखमी

googlenewsNext

मुंबई - लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करून त्याला वाजतगाजत निरोप देत असताना विसर्जन मिरवणुकीत बाप्पाची चौदा फुटी मूर्ती कलंडल्याची घटना चारकोपमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे झालेल्या पळापळीमुळे चार महिलांसह दहा जण किरकोळ जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना सोमवारी घरी सोडण्यात आले. मूर्तीला तडे गेल्याने ती कलंडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली.
चारकोपच्या गणेशनगरमध्ये जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ गेल्या २८ वर्षांपासून ‘श्रीं’च्या मूर्तीची स्थापना करते. रविवारी विसर्जन मिरवणुकीत शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. रात्री १२च्या सुमारास बॅन्जो बंद करण्यात आला. त्याचवेळी ‘मूर्ती कलंडली, बाप्पा गिर गये’ अशी आरडाओरड झाल्याने गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांची पळापळ सुरू मूर्तीला मधून तडा गेल्याने ती अचानक कलंडली. त्यानंतर झालेल्या गोंधळात चार महिला, सहा पुरुष जखमी झाले.
सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मूर्तीचे तातडीने विसर्जन करण्यात आले. जखमींवर प्रथमोपचार करून सोमवारी सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
जखमींमध्ये मंडळाचे अध्यक्ष दिनेश साळवी यांची बहीण प्रगती साळवी-हिंदळेकर तसेच पदाधिकारी इम्रान खान यांच्या ११ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

पदाधिकाऱ्यांकडे
चौकशी करणार
रविवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेत दहा ते अकरा जण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत मंडळाच्या पदाधिकºयांकडे चौकशी केली जाणार आहे.
- प्रमोद धावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चारकोप पोलीस ठाणे

पोलिसांना तपासात सहकार्य
अठ्ठावीस वर्षांत पहिल्यांदाच असा वाईट अनुभव आम्हाला आला आहे. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. आम्ही पोलिसांना तपासात योग्य ते सहकार्य करीत आहोत.
- दिनेश साळवी, अध्यक्ष, जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ

Web Title:  Ten people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.