होमिओपॅथीवर दहा टक्के जणांचा विश्वास

By Admin | Published: February 14, 2016 12:11 AM2016-02-14T00:11:40+5:302016-02-14T00:11:40+5:30

भारताच्या उपचार पद्धतीचा वारसा होमिओपॅथी पद्धतीने आत्मसात केला आहे. या उपचार पद्धतीच्या विश्वसनीयतेमुळे होमिओपॅथीने एक वेगळे स्थान निर्माण केले असून देशातील दहा टक्के

Ten percent of people believe in homeopathy | होमिओपॅथीवर दहा टक्के जणांचा विश्वास

होमिओपॅथीवर दहा टक्के जणांचा विश्वास

googlenewsNext

नागपूर : भारताच्या उपचार पद्धतीचा वारसा होमिओपॅथी पद्धतीने आत्मसात केला आहे. या उपचार पद्धतीच्या विश्वसनीयतेमुळे होमिओपॅथीने एक वेगळे स्थान निर्माण केले असून देशातील दहा टक्के जनता आजही आपल्या आरोग्यासंदर्भात होमिओपॅथी उपचार पद्धतीवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज येथे केले.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होमिओपॅथिक फिजिशियन्स महाराष्ट्र राज्य (आयआयएचपी) तर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे होमिओपॅथ तज्ज्ञांची ‘होमिओ व्हिजन नागपूर-२०१६’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रेन्झो गॅलसी, कोषाध्यक्ष डॉ. अ‍ॅल्टन अगोग्लू, सीसीआरचे महासंचालक डॉ. आर.के. मनचंदा, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे फॅकल्टी डीन डॉ. व्ही.आर. कवीश्वर, इस्रोचे विरेंद्र कुमार, आयआयएचपीचे अध्यक्ष डॉ. रमाकांत दगडे, डॉ. एम.ए. राव, डॉ. अजय दहाट, व्ही.के. गुप्ता, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. हरीश धुरट उपस्थित होते.
श्रीपाद नाईक म्हणाले, भारतीय उपचार पद्धतींमध्ये संशोधनासाठी आता लक्ष घातले जात आहे. केंद्रीय होमीओपॅथी परिषद आणि अनुसंधान परिषद होमिओपॅथीत संशोधन करण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात स्वस्त आणि सुलभ उपचार पद्धतीमुळे माता मृत्यू दर, प्रजनन आणि जन्मलेल्या बाळांच्या मृत्यू दरावर नियंत्रण आणण्यासाठी होमिओपॅथी एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकते. होमिओपॅथीवर लोकांना अधिकाधिक विश्वास वाढावा, यासाठी होमिओपॅथीचे शास्त्रोक्त तत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. याप्रसंगी डॉ. कवीश्वर यांनी सांगितले की, राज्यात ६६ हजार होमिओपॅथस्ची नोंदणी आहे. परंतु एकही डिस्पेन्सरी नाही. नागपुरात खासगी कॉलेज व डिस्पेन्सरी आहेत. तेव्हा शासकीय महाविद्यालयसुद्धा सुरू व्हावे, अशी मागणी केली. यावेळी होमिओपॅथी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रो. एम.पी. आर्या यांना सक्सेना मेमोरियल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)

केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी होमिओपॅथतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आयुषतर्फे केंद्रीय संशोधन परिषद आणि एलएमएचआय यांनी संयुक्तपणे हा दिवस साजरा करावा. या दिवशी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर होमिओपॅथीसंदर्भात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील, असेही त्यानी सांगितले.

विशेष डाक तिकीट जारी : होमिओपॅथतज्ज्ञांची ही २४ वी राष्ट्रीय परिषद आहे. या परिषदेत देशभरातील ५०० तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. यानिमित्त विशेष डाक तिकीटसुद्धा यावेळी जारी करण्यात आले.

Web Title: Ten percent of people believe in homeopathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.