अंतिम फेरीत दहा नाटकांची चुरस !
By admin | Published: March 28, 2017 03:30 AM2017-03-28T03:30:07+5:302017-03-28T03:30:07+5:30
२९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाश्ट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल झाला आहे
मुंबई : २९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाश्ट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल झाला आहे. या स्पर्धेत एकूण २४ नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. त्यामध्ये अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड करण्यात आली आहे.
अमर फोटो स्टुडिओ (सुबक), एक शून्य तीन (रुजुता प्रॉडक्शन्स), कोडमंत्र (अनामिका रसिका प्रॉडक्शन), मग्न तळयाकाठी (जिगिषा आणि अष्टविनायक), किमयागार (स्वरानंद आणि व्ही. आर. प्रॉडक्शन्स), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन्स), ती फुलराणी (अष्टगंध), साखर खाल्लेला माणूस (एकदंत क्रिएशन्स), बंध-मुक्त (जगदंब क्रिएशन्स), यु टर्न-२ (जिव्हाळा) अशी अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेल्या दहा नाटकांची नावे आहेत.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजय टाकळे, श्रीनिवास नार्वेकर आणि प्रसाद ठोसर यांनी काम पाहिले. या स्पर्धेची अंतिम फेरी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह (पनवेल) येथे १ मे ते ६ मे २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)