दहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: January 14, 2016 02:38 AM2016-01-14T02:38:39+5:302016-01-14T02:38:39+5:30
राज्य पोलीस दलातील तिघा विशेष महानिरीक्षकासह १० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर पंधरवड्यापूर्वी बढती मिळालेल्या राज्यातील १२३ साहाय्यक आयुक्त/
मुंबई : राज्य पोलीस दलातील तिघा विशेष महानिरीक्षकासह १० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर पंधरवड्यापूर्वी बढती मिळालेल्या राज्यातील १२३ साहाय्यक आयुक्त/ उपाधीक्षकांना पोस्टिंग दिले आहे. गृह विभागाने मंगळवारी रात्री त्याबाबतचे आदेश काढले. दोघा अधिकाऱ्यांशिवाय गुन्हे अन्वेषण विभागातील दत्तात्रय मंडलिक यांची अमरावती आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर तेथील राजकुमार व्हटकर यांची नागरी हक्क व संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या अधीक्षक आरती सिंग यांची नागपूर सीआयडीला तर परभणीतील अपर अधीक्षक अमोक जीवनगावकर यांची जालन्याच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीसीआरचे अधीक्षक सुनील भारद्वाज यांची ठाण्याच्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विवेक मासर व अमित काळे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीडचे अपर अधीक्षक कालिदास सूर्यवंशी यांची लातूर पोलीस केंद्रात बदली केली आहे. ३१ डिसेंबरला बढती दिलेल्या १२३ साहाय्यक अधीक्षक/ उपाधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ४१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
आशुतोष डुंबरे यांनी स्वीकारला पदभार
बदली झालेल्यांमध्ये ठाण्यातील अपर पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांचा समावेश आहे. आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्याकडून पदभार स्वीकारला. लक्ष्मीनारायण यांची पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात बदली झाली.