डिसेंबरपर्यंत गिरणी कामगारांसाठी दहा हजार घरे

By admin | Published: July 17, 2015 12:07 AM2015-07-17T00:07:55+5:302015-07-17T00:07:55+5:30

गिरणी कामगारांसाठी डिसेंबरपर्यंत म्हाडा आणि एमएमआरडीएची १० हजार घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

Ten thousand houses to the mill workers till December | डिसेंबरपर्यंत गिरणी कामगारांसाठी दहा हजार घरे

डिसेंबरपर्यंत गिरणी कामगारांसाठी दहा हजार घरे

Next

मुंबई : गिरणी कामगारांसाठी डिसेंबरपर्यंत म्हाडा आणि एमएमआरडीएची १० हजार घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. एमएमआरडीएमार्फत आणखी ८ हजार ७१0 घरे डिसेंबर २0१६पर्यंत उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.
घरांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठ महिन्यांत कोणतीही चर्चा केली नसल्याने संतप्त गिरणी कामगारांनी बुधवारी धडक मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली. ते म्हणाले, गिरणी कामगारांसाठी १९ गिरण्यांच्या ६.८३ हेक्टर जमिनीवर ६ हजार ९२५ सदनिका उपलब्ध झालेल्या आहेत. गिरणी कामगारांची माहिती संकलन करण्याकरीता म्हाडातर्फे दिलेल्या जाहिरातीनुसार गिरणी कामगारांचे एकूण १,४८,०६७ अर्ज प्राप्त झाले. या टप्प्याअंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या ६ हजार ९२५ सदनिकांसाठी जुलै २0१२ रोजी सोडत काढली होती. आजपर्यंत ५,६४४ कामगारांना सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकूण १ हजार २८१ सदनिकांचा विविध कारणास्तव ताबा देण्यात आला नाही. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत म्हाडामार्फत ६,७९४ सदनिका ६ गिरण्यांमधील संबंधित गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणार असून या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याअंतर्गत १० गिरण्यांच्या जमिनीवर एकूण २,९११ सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत डिसेंबरपर्यंत म्हाडाच्या ५,२०० तसेच एमएमआरडीएमार्फत उपलब्ध होणाऱ्या ४,८०० अशा एकूण १० हजार सदनिकांसाठी लॉटरीद्वारे वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Web Title: Ten thousand houses to the mill workers till December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.