दहा वर्षानंतर संमेलनाची वारी मराठवाडय़ाकडे

By admin | Published: June 26, 2014 10:56 PM2014-06-26T22:56:31+5:302014-06-26T22:56:31+5:30

साहित्य विश्वात वेगाने वाहू लागले असून, यंदा हे वारा मराठवाडय़ाच्या दिशेनेच वाहत असल्याचे संकेत आहेत.

Ten years later, Marathwada, the candidate for the seminar | दहा वर्षानंतर संमेलनाची वारी मराठवाडय़ाकडे

दहा वर्षानंतर संमेलनाची वारी मराठवाडय़ाकडे

Next
>पुणो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा कुठे? याविषयीचे वारे साहित्य विश्वात वेगाने वाहू लागले असून, यंदा हे वारा मराठवाडय़ाच्या दिशेनेच वाहत असल्याचे संकेत आहेत. संमेलनाचा खर्च आणि दुष्काळग्रस्त भाग, असा ताळमेळ जुळून न आल्यानेच की काय; पण गेली अनेक वर्षे येथे संमेलन झालेले नाही. त्यामुळे तब्बल 1क् वर्षानी हा योग जुळून येण्याची चिन्हे आहेत. 
स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबादची पाहणी केली असून, त्याला सकारात्मक प्रतिसादाची चिन्हे दिसत आहेत. यंदा साहित्य संमेलनासाठी 1क् ठिकाणांहून निमंत्रणो आली. आजवरचा हा विक्रम असला, तरी सर्व स्थळांना भेटी देणार असल्याचे स्थळ निवड समितीने ठरविले आहे. निवड समिती दि. 1 जुलै रोजी स्थळाबाबतची घोषणा करणार असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. 
यंदा पंजाब राज्यातील अमृतसर येथील घुमान गावातील संत नामदेव गुरुद्वारा सभा, बडोद्यातील मराठी वा्मय परिषद, साता:यातील महराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, कल्याण येथील सार्वजनिक वाचनालय, कळवे (जि. ठाणो) येथील जवाहर वाचनालय, कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, जालना येथील महाराष्ट्र रात्री पाठशाला शिक्षा समिती, मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा, चंद्रपूर जिल्ह्यातील तळोशी (नागभीड) येथील कल्याण शिक्षण संस्था, डोंबिवली पूर्व (जि. ठाणो) येथील कल्याण-शीळ रस्त्यावरील माणपाडा येथील आगरी यूथ फोरम या 1क् ठिकाणांहून निमंत्रणो महामंडळाकडे आली आहेत. (प्रतिनिधी)
 
4 आजवरच्या साहित्य संमेलनाचा इतिहास पाहता, नारायण सुव्रे यांच्या अध्यक्षतेखाली परभणी येथे 1995मध्ये संमेलन झाले होते. त्यानंतर 1998मध्ये द. मा. मिरासदार यांच्या अध्यक्षतेखाली परळी वैजनाथ व 2क्क्4मध्ये  रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे संमेलन झाले आहे. पण, त्यानंतर संमेलनाचा योग या भागात जुळून आलेला नाही. 

Web Title: Ten years later, Marathwada, the candidate for the seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.