समृद्धी महामार्गासाठी १८ कंपन्यांच्या निविदा पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:35 PM2018-05-23T23:35:15+5:302018-05-23T23:35:15+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Tender eligible for 18 companies for the Samrudhiyya highway | समृद्धी महामार्गासाठी १८ कंपन्यांच्या निविदा पात्र

समृद्धी महामार्गासाठी १८ कंपन्यांच्या निविदा पात्र

googlenewsNext

मुंबई : नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकाम प्रक्रियेसाठी एकूण १८ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. ७०० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या १३ पॅकेजेसच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या वित्तीय निविदा आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे खुल्या करण्यात आल्या. यात बांधकाम प्रक्रियेसाठी १८ कंपन्या पात्र ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२गावांना जोडणाऱ्या या समृद्धी महामार्गामुळे कृषी, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पर्यटन आदी क्षेत्रांना चालना मिळणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळही या महामागार्मुळे निम्म्यावर येणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा महामार्ग भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय रस्ता परिषदेच्या (आयआरसी) नियमांनुसार या महामागार्ची उभारणी करण्यात येणार आहे. एकूण १६ पॅकेजेसमध्ये या प्रस्तावित महामार्गाचे विभाजन करण्यात आले असून त्यातील १३ पॅकेजेससाठी अर्हताप्राप्त कंत्राटदारांकडून वित्तीय निविदा मागविण्यात आल्या होत्या. उर्वरित तीन पॅकेजेससाठीही वित्तीय निविदांचे काम प्रगतिपथावर आहे.
एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले की, वित्तीय निविदा खुल्या करण्याच्या या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. निविदा प्रक्रियेदरम्यान पात्र ठरलेल्या कंपन्या पुढीलप्रमाणे : मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रा लि., एनसीसी लि., टीपीएल सेंगिझ जेव्ही, एल अँड टी लि., सद्भाव इंजिनीअरिंग लि., रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्राटेक लि., अ‍ॅफकाँन इन्फ्रास्ट्रक्चर लि., बीएससीपीएल जीव्हीपीआर जे/व्ही, नवयुग इंजिनीअरिंग कं. लि., अ‍ॅप्को इन्फ्राटेक प्रा. लि., आयएलएफएस ट्रान्सपायरेशन नेटवर्क लि., केएनआर कन्स्ट्रकन्स लि., दिलीप बिल्डकाँन लि., माँटेकार्लो लि., आयर्न टिंगल लि., अशोका बिल्डकाँन लि., गायत्री प्रोजेक्ट्स लि., ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग प्रा. लि.
 

Web Title: Tender eligible for 18 companies for the Samrudhiyya highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.