जामोद येथे तणाव, पोलिसांचा हवेत गोळीबार!

By admin | Published: April 17, 2016 01:12 AM2016-04-17T01:12:56+5:302016-04-17T01:12:56+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; तुफान दगडफेकीत दोन जण गंभीर जखमी.

Tension in Jamod, police firing in air! | जामोद येथे तणाव, पोलिसांचा हवेत गोळीबार!

जामोद येथे तणाव, पोलिसांचा हवेत गोळीबार!

Next

जामोद (जि. बुलडाणा) : महाप्रसादासाठी भाकरी गोळा करीत फिरत असलेला ट्रॅक्टर अडविल्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊन, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याची घटना शनिवारी रात्री येथे घडली. दगडफेकीत ९ जण जखमी झाले असून यापैकी दोन जण गंभीर आहेत. दरम्यान, गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जामोद येथील माळी खेल भागातील श्रीराम मंदिरात राम नवमीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी रथाची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी राम मंदिरात ३0 पोत्यांचा महाप्रसाद वितरित केला जातो. यासाठी गावामध्ये भाकरी तयार करण्यासाठी महिलांना घरोघरी ज्वारीचे पीठ दिल्या जाते. तयार झालेल्या भाकरी ट्रॅक्टरद्वारे जमा करण्यात येता त. महाप्रसादासाठी एकत्रित केल्या जात असलेल्या भाकरीचा ट्रॅक्टर शिवापुरा भागात ९.३0 वाज ताच्या सुमारास एका समुदायाच्या लोकांनी अडविला. यावेळी बाचाबाची होऊन प्रकरण वाढले. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर मुख्य चौक असलेल्या सुभाष चौकातील पानटपर्‍यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. सुभाष चौकाप्रमाणेच गावातील बेंबळेश्‍वर महादेव मंदिरावरही दगडफेक करुन मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या ऐतिहासिक मंदिराची भिंत सुरुंग लावून उडविण्यात आली. तर एका प्रार्थनास्थळाची जाळपोळ करण्यात आली. याशिवाय अनेक भागात जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. दगडफेकीत हरिभाऊ ढगे आणि नंदकिशोर दलाल हे गंभीर जखमी झाले. तर इतर नऊ ते दहा जण किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे प्रसादासाठी पंगतीमध्ये बसलेल्या पुरुष व महिलांमध्ये प्रचंड गोंधळ व पळापळ झाली. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Tension in Jamod, police firing in air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.