सैराटची आर्ची झाली दहावी पास
By admin | Published: June 13, 2017 11:56 AM2017-06-13T11:56:21+5:302017-06-13T13:34:23+5:30
सैराट चित्रपटाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावी परेक्षेत पास झाली आहे. रिंकू 66 टक्के गुण मिळवून दहावी पास झाली झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - सैराट चित्रपटाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावी परेक्षेत पास झाली आहे. रिंकू 66.40 टक्के गुण मिळवून दहावी पास झाली झाली आहे. नववीच्या परीक्षेत रिंकूला ८१.६० टक्के गुण मिळाले होते. या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. स्वाभाविकच, तिच्या दहावीच्या निकालाबद्दलही प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मीडियावर जोकही व्हायरल झाले होते. अखेर, "आर्ची"नं दहावीच्या परीक्षेत "फर्स्ट क्लास" यश मिळवलं आहे.
आर्चीला पाचशेपैकी 327 गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50 असे यश तिने मिळवले आहेत. फक्त एका महिन्याच्या कालावधीत अभ्यास करुन रिंकूने परीक्षेत मिळवलेले यश प्रशंसनीय असल्याची भावना तिच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. रिंकूच्या निकालाची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैराटमुळे रिंकू राजगुरु आर्ची या नावाने देशभरात प्रसिद्ध झाली. पण, रिंकु राजगुरे हेसुद्धा तिचे खरे नाव नाहीये. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे.
दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे.
१७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण मध्ये ९६.१८ टक्के विद्यार्था पास झाले आहेत. 90 टेक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका २४ जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले.