हज यात्रा रक्कम जमा करण्यासाठी २ जुलैपर्यंत मुदत

By admin | Published: June 13, 2016 05:00 AM2016-06-13T05:00:56+5:302016-06-13T05:00:56+5:30

हजसाठी जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंना दर्जानिहाय द्याव्या लागणाऱ्या दराची निश्चिती ‘हज कमिटी आॅफ इंडिया’तर्फे करण्यात आली आहे.

Term deposits up to July 2 for Haj pilgrimage | हज यात्रा रक्कम जमा करण्यासाठी २ जुलैपर्यंत मुदत

हज यात्रा रक्कम जमा करण्यासाठी २ जुलैपर्यंत मुदत

Next


मुंबई : हजसाठी जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंना दर्जानिहाय द्याव्या लागणाऱ्या दराची निश्चिती ‘हज कमिटी आॅफ इंडिया’तर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी संबधितांनी २ जुलैपर्यंत रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हज कमिटीच्या माध्यमातून जाणाऱ्या भाविकांना ‘ग्रीन’ वर्गासाठी सरासरी २ लाख १८ हजार तर ‘अजीजा’ वर्गासाठी १ लाख ८४ हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. कमिटीमार्फत हजला जाणाऱ्या भाविकाकडून पहिल्या टप्प्यात ८१ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम संबंधितांनी स्टेट बँक आॅफ इंडिया किंवा बँक आॅफ इंडियाच्या हज कमिटीच्या खात्यावर किंवा आॅनलाइन अकाऊंटवर २ जुलैपर्यंत जमा करावी, असे आवाहन कमिटीने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Term deposits up to July 2 for Haj pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.