पीटरच्या चाचणीत ५० प्रश्नांची पडताळणी

By admin | Published: November 30, 2015 02:50 AM2015-11-30T02:50:07+5:302015-11-30T02:50:07+5:30

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आरोपी पीटर मुखर्जीची लाय डिटेक्टर चाचणी (पॉलिग्राफ टेस्ट) दिल्लीतील मध्यवर्ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत झाली

Testing of 50 questions in the test of Peter | पीटरच्या चाचणीत ५० प्रश्नांची पडताळणी

पीटरच्या चाचणीत ५० प्रश्नांची पडताळणी

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आरोपी पीटर मुखर्जीची लाय डिटेक्टर चाचणी (पॉलिग्राफ टेस्ट) दिल्लीतील मध्यवर्ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत झाली. चार तास चाललेल्या या चाचणीमध्ये मुखर्जीला केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) शीनाच्या खुनाच्या कटात त्याची भूमिका व त्याच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रश्न विचारले. शीना बोरा हिच्याशी त्याचे शारीरिक संबंध होते का, अशीही विचारणा चाचणीत करण्यात आली. चाचणी घेतली जात असताना तेथे उपस्थित असलेल्या सीबीआयच्या सूत्रांनी मुखर्जीला ५० पेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले. त्याने या प्रश्नांना काय उत्तरे दिली, हे सूत्रांनी सांगितले नाही.
शीना बोराच्या खुनाच्या कटाची माहिती अगदी सुरुवातीपासून होती का, खुनाचा कट रचण्यात तुझा सहभाग होता का की, तिचा खून झाल्यानंतरच तुला ते कळले आदी प्रश्न त्याला विचारण्यात आले होते, असे या सूत्रांनी सांगितले. शीनाशी तुझे शारीरिक संबंध होते का, तिच्याशी कधी तुझे प्रेम प्रकरण सुरू होते का, असेही प्रश्न त्याला विचारण्यात आले. शीनाच्या खुनाचा हेतू काय हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न सीबीआय करीत आहे. शीना बोरा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्यानंतर पीटर त्याचा मुलगा राहुल याला (राहुल आणि शीना यांचे प्रेमसंबंध होते) तू तिच्यातून मुक्त होऊन नवे जीवन सुरू कर, असा सल्ला ईमेल्सद्वारे देत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रश्न त्याला विचारल्यानंतर थोडावेळ विश्रांती घेण्यात आली. खुनाशी संबंधित काही प्रश्न विचारल्यानंतर, इतर विषयावरील प्रश्न होते. उद्देश एवढाच होता की, तो प्रश्नांना योग्य ती उत्तरे देत आहे की नाही हे पडताळण्याचा.
इंद्राणीने दिली होती आत्महत्येची धमकी
डिप्पी वांकाणी ल्ल मुंबई
‘संयुक्त नावावर (पीटर आणि इंद्राणी)े मालमत्ता हस्तांतरित केली नाही, तर मी चौथ्या मजल्यावरून उडी मारीन, अशी धमकी इंद्राणीने मला दिली होती,’ असे पीटर मुखर्जीने मुंबई पोलिसांना सांगितले. पीटरने पोलिसांना दिलेल्या निवेदनात, १९९३ पासून तो मुंबईत २००५ मध्ये येईपर्यंतचा प्रवास सांगितला. ‘मी त्या निवासस्थानी भाड्याने राहात होतो व केवळ इंद्राणीने खूप आग्रह केला, म्हणून मी ती मालमत्ता तीन कोटी रुपयांत
विकत घेतली. २००२ मध्ये
इंद्राणीशी माझे लग्न झाले, त्यावेळी तिच्याकडून केवळ दोन मित्र, तर
माझे ४० नातेवाईक उपस्थित
होते,’ असे पीटर मुखर्जी याने सांगितले.
पीटर मुखर्जी हाँगकाँगहून १९९३ मध्ये भारतात आला. ‘शाश्वती बॅनर्जी आणि माझ्या प्रेम संबंधांवरून माझी पत्नी शबनम सिंह हिच्याशी खटके उडत होते. १९९४ च्या मे/जूनमध्ये शबनम सिंह आणि मी वेगळे झालो व नंतर आमचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाशी संबंधित दस्तावेज इंग्लडमधील बर्कमहॅप्म्स्टेड येथे तयार करण्यात आला. न्यायालयाने पत्नी आणि मुलांसाठी पोटगीची रक्कम निश्चित केली, मी ती दरमहा त्यांना देत होतो. ते बर्कमहॅप्म्स्टेडमधील माझ्या घरी राहात होते व २००२ मध्ये मी ती मालमत्ता शबनम सिंहच्या नावावर हस्तांतरित केली,’ असे मुखर्जीने सांगितले.
‘१९९४ मध्ये शबनमशी घटस्फोट झाल्यानंतर मी कुलाब्यातील रेडिओ क्लब येथे मुक्कामाला होतो. त्यानंतर मी कांदिवलीतील (पूर्व) शंकर एन्क्लेव्ह येथे राहायला गेलो. त्यावेळी माझी मैत्रीण शाश्वती बॅनर्जी मला भेटायला यायची आणि माझ्यासोबत राहायचीदेखील,’ असे त्याने सांगितले. १९९८ मध्ये स्टार टीव्हीचा मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्याला पदोन्नती मिळाल्यानंतर, पीटर मुखर्जी मोठमोठ्या पार्ट्यांना हजर राहू लागला आणि अशाच एका पार्टीमध्ये त्याची ओळख इंद्राणीशी करून देण्यात आली. ‘२००० ते २००१ या दरम्यान शाश्वती आणि माझ्यात खटके उडत होते व त्यामुळे ती मला कायमची सोडून गेली. आॅक्टोबर २००१ मध्ये मी मुंबईतील कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये गेलो असताना, मी माझे मित्र अलेक पद््मसी आणि विकास वर्मा यांना भेटलो. यावेळी त्यांनी माझी ओळख पहिल्यांदा इंद्राणीशी करून दिली,’ असेही पीटर मुखर्जीने सांगितले.
मुखर्जीने सांगितले की, ‘१० नोव्हेंबर २००२ रोजी मी वरळीतील पोलीस तरण तलाव येथे इंद्राणीशी लग्न केले. लग्नाला इंद्राणीकडून तिचा मित्र अभिसेन सेन आणि इंद्राणीची बालपणीची मैत्रीण बंगळुरूच्या श्रीमती महुआ चिनप्पा वगळता, तिचे कोणतेही नातेवाईक उपस्थित नव्हते. माझ्याकडून माझे मुलगे राहुल व रॉबीन, काका, काकू, पुतण्या, मामा आदी ४० नातेवाईक हजर होते.’

Web Title: Testing of 50 questions in the test of Peter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.