मराठी भाषा दिनाकडे महाविद्यालयांची पाठ

By admin | Published: May 2, 2015 01:40 AM2015-05-02T01:40:56+5:302015-05-02T10:24:58+5:30

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा झाला. हा दिवस महाविद्यालयांनी साजरा करणे अपेक्षित असते

Text of colleges in Marathi language day | मराठी भाषा दिनाकडे महाविद्यालयांची पाठ

मराठी भाषा दिनाकडे महाविद्यालयांची पाठ

Next

मुंबई : कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा झाला. हा दिवस महाविद्यालयांनी साजरा करणे अपेक्षित असते. तशा सूचना त्यांना मुंबई विद्यापीठातर्फे देण्यात आल्या होत्या. परंतु, विद्यापीठाशी संलग्न ७४० पैकी १७१ महाविद्यालयांनीच मराठी भाषा दिवस साजरा केल्याचे उघड झाले आहे.
मराठी भाषा दिन साजरा केल्याचा अहवाल विद्यापीठाकडे सादर करण्याची सूचना महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे देण्यात येतात. जी महाविद्यालये भाषा दिन साजरा करणार नाहीत, अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या होत्या. महाविद्यालयांनी मराठी भाषा दिन साजरा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ १७१ महाविद्यालयांनी याबाबतचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविला आहे. मराठी अस्मिता जपण्यासाठी महाविद्यालयांनी मराठी भाषा दिन साजरा केला पाहिजे. मराठी भाषा दिन साजरा करा, असे परिपत्रक काढण्याची गरज विद्यापीठाला भासू नये, असे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Text of colleges in Marathi language day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.