उच्चभ्रू वस्तीत मतदानाकडे पाठ

By admin | Published: February 23, 2017 03:20 AM2017-02-23T03:20:14+5:302017-02-23T03:20:33+5:30

नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयातील तीन प्रभागांत सुमारे ४६ टक्के मतदान झाले

Text to upper caste voting | उच्चभ्रू वस्तीत मतदानाकडे पाठ

उच्चभ्रू वस्तीत मतदानाकडे पाठ

Next

चंदननगर : नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयातील तीन प्रभागांत सुमारे ४६ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. आता निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
विमाननगर प्रभागात अतिशय अल्प प्रतिसाद मतदारांनी दाखविला, तर विमाननगर अतिशय उच्चभ्रू मतदारांचा भाग असलेल्या या प्रभागातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. तर, मध्यमवर्गीय व झोडपट्टीतील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. दिवसभरात दुपारी उन्हामुळे मतदारांनी पाठ फिरविली.
खराडी-चंदननगर प्रभाग क्र. ४ या प्रभागात मोठमोठ्या सोसायट्या आहेत; मात्र त्यांनीही मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मध्यमवर्गीय व ऐकमेव झोपडपट्टीचा भाग असलेली बीडी कामगार झोपडपट्टील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागात एकूण ५०.८५ टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. ५ वडगावशेरी-कल्याणीनगर या प्रभागात एकूण ५१.२६ टक्के मतदान झाले.

Web Title: Text to upper caste voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.