ठामपा मुख्यालयाचा स्लॅब कोसळला

By Admin | Published: March 11, 2015 02:12 AM2015-03-11T02:12:39+5:302015-03-11T02:12:39+5:30

एकीकडे शहरातील सर्व इमारतींना स्ट्रक्चरल आॅडीट करण्यास भाग पाडणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आपल्याच मुख्यालयाच्या इमारतीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

Thabpa headquarter slab collapses | ठामपा मुख्यालयाचा स्लॅब कोसळला

ठामपा मुख्यालयाचा स्लॅब कोसळला

googlenewsNext

ठाणे : एकीकडे शहरातील सर्व इमारतींना स्ट्रक्चरल आॅडीट करण्यास भाग पाडणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आपल्याच मुख्यालयाच्या इमारतीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. पाचपाखाडीतील मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब सोमवारी सायंकाळी कोसळला. सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
ठाणे महापालिका मुख्यालय भवनाचे भूमीपूजन १९८५ मध्ये झाले होते. तर १९८९ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते या वास्तुचे लोकार्पण झाले. अवघ्या २५ वर्षांतच पालिकेच्या मुख्यालयाची दुरवस्था झाली आहे. इमारतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. सोमवारी सायंकाळी दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. शहरातील जुन्या झालेल्या इमारतींना महापालिका नोटीसा पाठवून बांधकाम धोकादायक ठरवते. पण आपल्याच मुख्यालयाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेवरुन उघड झाले आहे. विशेष म्हणजे वर्षभरातील हा तिसरा प्रकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे लोखंडी सळया उघडया पडल्या आहेत. मात्र, हा किरकोळ प्रकार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Thabpa headquarter slab collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.