“श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:51 AM2024-04-02T09:51:30+5:302024-04-02T09:52:41+5:30

Shiv Sena Thackeray Group Ayodhya Poul News: आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर अन् निष्ठावंत आहोत. धोका देऊन पळून जाणारे गद्दार नाहीत, अशी टीका अयोध्या पौळ पाटील यांनी केली आहे.

thackeray ayodhya poul patil clear about to contest kalyan lok sabha election 2024 and criticised opposition | “श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ

“श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ

Shiv Sena Thackeray Group Ayodhya Poul News: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटप, उमेदवारी यांवरून शह-काटशह सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीचे काही जागांवर घोडे अडले असून, अद्यापही अंतिम निर्णय होताना दिसत नाही. कल्याण लोकसभा जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा तगडे आव्हान देण्यासाठी ठाकरे गट चाचपणी करत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांनी कल्याण लोकसभा लढवत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. यावरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.

कल्याण लोकसभेसाठी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यातच ०१ एप्रिल २०२४ रोजी अयोध्या पौळ पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात कल्याण लोकसभा निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. “आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद , आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई, साईनाथजी दुर्गे”, अशी पोस्ट अयोध्या पौळ पाटील यांनी केली होती. 

आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन

या पोस्टनंतर रात्री आणखी एक पोस्ट एक्सवर शेअर करत अयोध्या पौळ पाटील यांनी एक खुलासा केला. त्यामध्ये वरील पोस्ट एप्रिल फुलची असल्याचे स्पष्ट केले. नव्या पोस्टमध्ये अयोध्या पौळ लिहितात की, आज परिक्षा संपल्या एकदाच्या. आता लोकसभा-विधानसभेसाठी ऊर्जेने कार्यरत. "एप्रिल फूल" ची पोस्ट शुभचिंतक व विरोधकांना इतकी आवडली की 3 तासात 228 मिसकॉल आले. श्रीकांतच काय आदरणीय साहेबांनी "आदेश" दिले तर मोदी साहेबांच्या विरोधात पण उमेदवारी अर्ज दाखल करेल. आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर अन् निष्ठावंत. धोका देऊन पळून जाणारे गद्दार नाहीत. कशाला नाद करता आमच्या साहेबांचा, असे या नव्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, कल्याण लोकसभेसाठी  ठाकरे गटाकडून या आधी सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुभाष भोईर, केदार दिघे, अशी काही नावे चर्चेत होती. अयोध्या पोळ यांच्या ट्विटर  अकाऊंटवर ही पोस्ट दुपारपर्यंत तरी दिसत होती. नवीन खुलासा करणारी पोस्ट आता दिसत नसल्याचे ती डिलीट केली असावी, असे सांगितले जात आहे. 

 

Web Title: thackeray ayodhya poul patil clear about to contest kalyan lok sabha election 2024 and criticised opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.