राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:09 PM2024-04-03T14:09:48+5:302024-04-03T14:17:54+5:30

Lok Sabha Election 2024 : हातकणंगले जागेवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र या मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे.

Thackeray faction candidate, Satyajit Patil against Raju Shetty in Hatkanangle | राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात

राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमदेवार यादी जाहीर झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कल्याण, पालघर, हातकणंगले आणि जळगाव या चार जागांसाठी ही उमेदवारांची यादी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. याठिकाणी सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले आहे. 

हातकणंगले जागेवर स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, ठाकरे गटाकडून राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. याला राजू शेट्टी यांनी नकार दिला होता. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. तर वंचितकडून डी. सी. पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे वर्चस्व आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. आता पुन्हा धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत.दरम्यान, ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पालघरमधून भारती कामडी आणि जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढत आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडेच राजकीय गणित पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी विनंती केली की, आमचा उमेदवार त्याठिकाणी द्यावा. राजू शेट्टी यांना आम्ही सांगितलं की, पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 

ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी  
बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक - राजाभाई वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई 

Web Title: Thackeray faction candidate, Satyajit Patil against Raju Shetty in Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.