शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून 'सरसकट धोकेबाजी': फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:11 AM2020-01-06T11:11:35+5:302020-01-06T11:18:24+5:30
ठाकरे सरकराने बदमाशी करून शेतकऱ्यांना फसवले
मुंबई: महाविकास आघडीच्या सरकराने केलेली कर्जमाफीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे अटी व शर्ती लागू अशाप्रकारे असून, कर्जमाफीच्या नावाखाली ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची 'सरसकट धोकेबाजी' केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
'शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू असे सांगणाऱ्यांनी नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. मात्र ही घोषणा म्हणजे अटी व शर्ती लागू अशाप्रकारे आहे. कर्जमाफीच्या आदेशात 2015 ते सप्टेंबर 2019 मधीलच कर्ज असावे असा उल्लेख केला गेला आहे. तर हे कर्ज थकबाकी व पिक कर्ज असायला हवे. कर्जमाफीच्या योजनेत मुदत कर्ज असणाऱ्यांना लाभ घेता येणार नाही, अशा अनेक अटी कर्जमाफीसाठी लावण्यात आल्या असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू, असे सांगणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र कर्जमाफीच्या नावाखाली 'सरसकट धोकेबाजी'च केली आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 5, 2020
- विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis#ZPelectionpic.twitter.com/nmLhOMCFtf
2019 च्या अक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे 60 ते 70 लाख शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. मात्र हे सरकार सप्टेंबर महिन्याच्या आधीच्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहे. ठाकरे सरकराने बदमाशी करून शेतकऱ्यांना फसवले असून, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची 'सरसकट धोकेबाजी' केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.