ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका; ७१.६८ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:13 AM2021-01-30T05:13:44+5:302021-01-30T05:14:07+5:30
सर्वात कमी ९ लाख ९७ हजार ३९७९ लाख ९७ हजार ३९७ नोटीस औरंगाबाद विभागात तर विदर्भात १६ लाख ७९ हजार ९८४ ग्राहकांना नोटीस गेल्या आहेत.
कमल शर्मा
नागपूर : ग्राहकांकडे ६० हजार कोटी रुपये थकबाकी साचल्यामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे कारण पुढे करीत महावितरणने थकबाकीदारांना वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. राज्यात ७१ लाख ६८ हजार ५९६ वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. नोटीसची मुदत ३० जानेवारीला संपेल. त्यानंतर सोमवारपासून वीज कनेक्शन कापण्याचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे.
महावितरणने धडक वसुलीची घोषणा करून २० केडब्ल्यू दाबापेक्षा अधिक ग्राहकांना प्रत्यक्ष आणि अन्य थकबाकीदारांना एसएमएसच्या माध्यमातून १५ डिसेंबरपासून नोटीस पाठविणे सुरू केले आहे. यात थकबाकी भरण्याचे आवाहन करून १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक नोटीस पुणे विभागातील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. तेथे २४ लाख १४ हजार ८६८ ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस गेल्या आहेत. सर्वात कमी ९ लाख ९७ हजार ३९७९ लाख ९७ हजार ३९७ नोटीस औरंगाबाद विभागात तर विदर्भात १६ लाख ७९ हजार ९८४ ग्राहकांना नोटीस गेल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळातील वीजबिलात सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.