बावनकुळे अडचणीत? पाच वर्षांतील कामांची महाचौकशी होणार; ठाकरे सरकारचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 08:00 PM2022-03-15T20:00:05+5:302022-03-15T20:03:58+5:30

प्रविण दरेकरांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणीत भर; चौकशी होणार

thackeray government orders inquiry of work done by chandrashekhar bawankule as power minister | बावनकुळे अडचणीत? पाच वर्षांतील कामांची महाचौकशी होणार; ठाकरे सरकारचे आदेश

बावनकुळे अडचणीत? पाच वर्षांतील कामांची महाचौकशी होणार; ठाकरे सरकारचे आदेश

googlenewsNext

मुंबई: राज्यातील सत्ताधारी विरोधकांमधील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. मुंबै बँक प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बावनकुळेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

फडणवीस सरकारच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे ५ वर्षे ऊर्जा मंत्री होते. त्यांच्या काळात झालेल्या सगळ्याच कामांची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात झालेली महावितरणाच्या कामांची आता चौकशी होईल. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. महिन्याभरात ही समिती आपला अहवाल सादर करेल.

बावनकुळे ऊर्जा मंत्री असताना झालेल्या कामांची प्रशासकीय, आर्थिक बाबींची चौकशी करण्यात येईल. महावितरणनं काढण्यात आलेल्या निविदांची किंमत वाढली का, वाढली असल्यास त्यामागील कारणं काय, त्यात अनियमितता होती का, याची चौकशी ठाकरे सरकार करणार आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महावितरणमध्ये अनेक पायाभूत कामं झाली. मात्र याच कालावधीत महावितरणची थकबाकीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली. बावनकुळे यांच्या काळात महावितरणनं हाती घेतलेल्या कामांची खरंच गरज होती का, त्या कामांचा लोकांना फायदा झाला का, हे शोधण्याचं काम चौकशी समिती करेल. 

गेल्या काही महिन्यांत ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात अनेकदा तू तू मै मै झाल्याचं राज्यानं पाहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते विदर्भातले आहेत.

Web Title: thackeray government orders inquiry of work done by chandrashekhar bawankule as power minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.