मराठा समाजाला ठाकरे सरकारची खास भेट; कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 09:17 PM2021-03-24T21:17:27+5:302021-03-24T21:18:07+5:30
thackeray govrenment takes important decision for maratha community: मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या कारमध्ये महिन्याभरापूर्वी स्फोटकं सापडली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर एकापाठोपाठ एक स्फोटकं घडामोडी सुरू झाल्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूलाच राहिले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झालं. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
मराठा समासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेला पुण्यातल्या शिवाजीनगर येथे येथे शासकीय जागा देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला. या निर्णयानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाचे आभार मानले. 'राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 'सारथी' संस्थेला शिवाजीनगर, पुणे येथे शासकीय जागा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचा आभारी आहे,' असं चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अशोक चव्हाण मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 'सारथी' संस्थेला शिवाजीनगर, पुणे येथे शासकीय जागा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचा आभारी आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 24, 2021
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय-
१. महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ मधील पद्व्युत्तर पदविका व पदवी धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ - सार्वजनिक आरोग्य विभाग
२. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील थेट नियुक्त प्राचार्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता- उच्च व तंत्रशिक्षण
३. सर्व महसुली विभागांत अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा समप्रमाणात भरणार. सरळसेवा व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम 2021 ही नवीन अधिसूचना काढणार- सामान्य प्रशासन
४. गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णय- महसूल
५. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेस पुणे जिल्ह्यातील चिखली येथे विस्तार केंद्रासाठी जागा- उच्च व तंत्रशिक्षण
६. रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी- उच्च व तंत्रशिक्षण विभाग
७. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारीत मान्यता