“मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार आहेत हे भासवायचेय”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 03:42 PM2024-02-05T15:42:37+5:302024-02-05T15:43:59+5:30

Thackeray Group Vs BJP: मुंबईतील समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून झाला नाही ती कोणाची गॅरंटी? असा सवाल करण्यात आली आहे.

thackeray group bhaskar jadhav criticised bjp pm modi and central govt over ayodhya ram mandir | “मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार आहेत हे भासवायचेय”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

“मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार आहेत हे भासवायचेय”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

Thackeray Group Vs BJP: २२ तारखेला रामाची प्रतिष्ठापना झाली. आपण त्याच स्वागत केले. भरभरून आनंद वाहत असताना अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावरून काही प्रश्न पडले आहेत. राम मंदिराचा इव्हेंट केला. मार्केटिंग तिकडे केले. राम मंदिर व्हावे म्हणून म्हणून प्रत्येकाच्या घरातील एक एक वीट गेलेली आहे. राम मंदिरामध्ये तुमची कुठेही श्रद्धा नाही. पण कुठेही फिरा, प्रभू रामचंद्र मोठ्या अवस्थेत असतात. अयोध्येमध्ये मोठे कटआऊट नरेंद्र मोदी यांचे लावण्यात आले. त्यामध्ये बाल अवस्थेत श्रीराम नरेंद्र मोदी यांचा बोट धरून जाताय. ही श्रीरामाची बाल अवस्थेतील मूर्ती का? कारण सगळ्यात मोठे मोदी त्यांना दाखवयाचे आहे. मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार हे भासवायचे आहे. रामचंद्रमध्ये मोठे की नरेंद्र मोदी मोठे? नरेंद्र मोदी हे राम राम करत जनतेला मरा मरा करत आहेत, त्यामुळे तुम्ही सावध राहा, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपा आणि केंद्रावर सडकून टीका केली. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. राजापूर येथे उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी संबोधित करण्याच्या आधी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी भाजपा आणि केंद्र सरकारवर तिखट शब्दांत हल्लाबोल केला. पंतप्रधान म्हणाले की, घराणेशाही संपवायची आहे. तर उद्धव साहेब म्हटले माझ्या घराणेशाहीचा मला अभिमान आहे. कुटुंब संवाद होतायत. आजकाल सर्वांच्या हातात मोबाईल आहे. त्यावरून कळतंय की, कोणते विषय घेतायत आणि ते मांडले जातायत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला नाही ती कोणाची गॅरंटी?

वंदे भारत ट्रेन सुरु केल्या. त्याचाही इव्हेंट केला जात आहे. त्या वंदे भारत ट्रेनमध्ये असे आहे काय? प्रत्येक गोष्टीत इव्हेंट करायचा यांना? रेल्वेला नवीन डबा जोडला तरी झेंडा दाखवायला मोदी असतात. प्रत्येक कामात मोदी असतात. २ जून रोजी ओडिसा येथे अपघात झाला होता तेव्हा २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ती कोणाची जबाबदारी ती कोणाची गॅरंटी? मालवण येथे महाराजांचा पुतळा उभा केला ती मोदी गॅरंटी मग मुंबईत समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून झाला नाही ती कोणाची गॅरंटी? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.

दरम्यान, पौष महिन्यात लग्न करायला किंवा बोलणी करायला जाऊ नको लग्न ठरलेले असले तरी भेटायला जाऊ देत नाहीत. मग पौष महिन्यात रामचंद्राची का स्थापना केली. पौष महिना अशुभ मानला जातो तर का केले? रामाचे राजकारण केले जात आहे. या देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती मुर्मू मॅडम आहेत. त्या कुठे होत्या. याच उत्तर पंतप्रधान यांनी दिले पाहिजे. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती कुठे होते? तो सरकारी कार्यक्रम होता तर सरकारचे मंत्री कुठे होते? अशी विचारणा करत भास्कर जाधव यांनी निशाणा साधला.

 

Web Title: thackeray group bhaskar jadhav criticised bjp pm modi and central govt over ayodhya ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.