“६७ आमदार असून आपने दिल्लीत भाजपाला ३ सदस्यांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले, आता आम्हाला...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:29 IST2025-03-11T14:29:06+5:302025-03-11T14:29:38+5:30

Thackeray Group Bhaskar Jadhav News: महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास काही तांत्रिक अडचण नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

thackeray group bhaskar jadhav said there is no technical glitch for opposition leader post for maha vikas aghadi | “६७ आमदार असून आपने दिल्लीत भाजपाला ३ सदस्यांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले, आता आम्हाला...”

“६७ आमदार असून आपने दिल्लीत भाजपाला ३ सदस्यांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले, आता आम्हाला...”

Thackeray Group Bhaskar Jadhav News: २०२४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाला किमान विरोधी पक्षनेता निवडीएवढ्याही जागा मिळालेल्या नाहीत. असे असले तरी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. उद्धवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते विधानसभा अध्यक्षांना भेटायला गेले होते. 

विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाबाबत प्रश्नचिन्हच होते. सरकार सक्षमपणे चालविण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता असते आणि त्याच भावनेतून कमी संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला देण्याचे निश्चित करण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याने गेले महिनाभर विरोधी पक्षनेतेपदाभोवती घोंगावणारे वादळ काहीसे शांत झाले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भेटीबाबत भास्कर जाधव यांनी माहिती दिली.

तीनही पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली

मीडियाशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेता म्हणून माझ्या नावाचे पत्र उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे. हे पत्र देताना आम्ही सगळे भेटलो होतो, तसेच तीनही पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. अन्य पक्षाच्या नेत्यांनाही विनंती करणार आहोत. तुम्हाला प्रचंड बहुमत मिळाले असले तरी विरोधी पक्षाला पद देणे हे त्या व्यक्तीला पद देणे असे नसून, तो लोकशाहीचा मान आणि लोकशाहीचा सन्मान आहे. तसेच संसदीय कार्यप्रणालीचा मान वाढवणारे ते असेल, असे भास्कर जाधव यांनी 

दरम्यान, महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेता होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष सकारात्मक दिसले आणि मुख्यमंत्री हे संसदीय कामकाजाला महत्त्व देणार आहेत, त्यामुळे तेही याबाबत सकारात्मक दिसले. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी नाहीत. तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहेत, असे सांगत सन १९८५-९० मध्ये कमी संख्येच्या सदस्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलेले आहे. तसेच दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या आम आदमी पक्षाचे ६७ आमदार निवडून आले असले तरी केवळ ३ सदस्य असलेल्या भाजपाला विरोधी पक्षनेते पद दिले होते, याचे भास्कर जाधव यांनी स्मरण करून दिले. 

 

Web Title: thackeray group bhaskar jadhav said there is no technical glitch for opposition leader post for maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.