अब्दुल सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:59 PM2022-10-23T12:59:19+5:302022-10-23T12:59:45+5:30

४ पक्ष फिरून आले. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू अशा शब्दात खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Thackeray group leader Chandrakant Khair's warning to Abdul Sattar over Uddhav thackeray visit to Aurangabad | अब्दुल सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा

अब्दुल सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा

googlenewsNext

औरंगाबाद - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा ठाकरे करणार आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव यांचा हा पहिलाच दौरा आहे. मात्र या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते सत्ताधारी नेत्यांवर जोरदार निशाणा साधत आहेत. 

या दौऱ्यावरून चंद्रकांत खैरे म्हणाले की, अब्दुल सत्तारसारखा माणूस ज्याने उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले ते आता त्यांच्यावर टीका करत आहेत. ४ पक्ष फिरून आले. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. आदित्य ठाकरे फिरलेत, आमदार, खासदार फिरले, मविआ नेते, विरोधी पक्षनेते राज्यभर फिरले. कितीही काय झालं तरी आता बस्स झालं. तोंड सांभाळा नाहीतर आम्ही कायदा दाखवून देऊ असा इशारा त्यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे. 

शेतकरी हवालदिल झाला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदल्यांमध्ये गुंग आहेत. ६९ ठिकाणी फिरलो असं सत्तार सांगतात पण त्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांना काय मदत केली. माझ्या पाया पडला मी प्रचाराला गेलो म्हणून निवडून आला. आता त्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे असंही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात केवळ २० मिनिटे शेतकऱ्यांसाठी दिलेत. त्यात ते काय काय पाहतात हे महत्त्वाचं आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. कुठल्याही मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकरी संकटात असताना मदत करण्याची भूमिका सत्ताधारी-विरोधक दोघांची असते. जी उद्धव ठाकरेंची मागणी असेल त्यावर तंतोतंत माहिती घेऊन पुढे कार्यवाही करू. आम्ही विरोधकांचा सन्मान ठेऊ. महत्त्वाच्या सूचना मांडल्यास त्यावर सरकार विचार करेल असं मंत्री सत्तारांनी सांगितले. 

त्याचसोबत मी ९ जिल्हे, ६९ तालुके फिरलो आहेत. मध्यरात्रीपर्यंत दौरे केला. शेतकऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार आहे. अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आला. त्याबद्दल धन्यवाद आहे. २० मिनिटे का होईना शेतकऱ्यांना भेटतायेत. आम्ही नुकसानग्रस्त शेती पाहायला जातो. सर्व परिस्थितीवर मंत्रिमंडळ लक्ष ठेवून आहे. ज्या ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते. त्यावर विविध पथकं येऊन तपासणी करतात त्यानंतर निर्णय घेतले जातात. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणे गरजेचे आहे. गेल्या २५ वर्षात पंचनामे होतात, मदतीची घोषणा होते. परंतु मदत पोहचू शकत नाही. या सरकारने तातडीने मदत जाहीर करून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकले असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

Web Title: Thackeray group leader Chandrakant Khair's warning to Abdul Sattar over Uddhav thackeray visit to Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.