एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर...; भास्कर जाधव कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:54 PM2023-02-28T14:54:38+5:302023-02-28T14:55:18+5:30
मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही असं भास्कर जाधव म्हणाले.
मुंबई - जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचा पवित्रा घेतला तेव्हा भास्कर जाधव यांनी १०० हून अधिक वेळा शिंदे यांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी कॉल केला होता. परंतु आमदारांच्या विरोधामुळे भास्कर जाधव यांना शिंदे गटात घेतले नाही असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला होता. त्यावरून आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही कडाडून उत्तर दिले आहे.
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मी तत्वासाठी लढतो. जर मोहित कंबोज १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. देवेंद्र फडणवीस आता सुरुवातच झाली असेल तुमच्याकडे सत्ता, पैसा, तपास यंत्रणा आहेत. मी तत्त्वासाठी, ध्येयासाठी लढतो. मी सामान्य माणूस आहे त्यामुळे अशी यंत्रणा लावा जर मी एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी लावले असले तरी मी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईन असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे. अनाजीपंतांना सांगतो. तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार संपवायला निघाला परंतु माझ्यासारखे भास्कर जाधव १०० उभे राहतील. तुम्ही १ आरोप सहन करू शकत नाही. मी सामान्य माणूस आहे. मी कुणाच्या दरवाजात राजकारणासाठी उभे राहिलो नाही. मोहित कंबोज, अनाजीपंत यांनी एक आरोप सिद्ध करून दाखवाव असं प्रतिआव्हान भास्कर जाधव यांनी दिले आहे.
दरम्यान, मी ट्रेनमधून प्रवास करताना फोन लागला नाही. तेव्हा भास्कर जाधव गायब अशा बातम्या झळकल्या. मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही. भास्कर जाधव कुणाच्या दरवाजात मला तुमच्या दरवाजा मला घ्या म्हणून याचना केली नाही. राजकारण माझे पोट भरण्याचा धंदा नाही. राजकारण माझे समाजसेवेचे साधन आहे. मी धंदे व्यवसाय शेती करून जीवन जगतोय त्यात समाधानी आहे असं भास्कर जाधव यांनी सांगितले.
...ते वर्मी लागलंय
मोहित कंबोजसारख्या माणसाने माझ्यावर आरोप करून माझे राजकीय कारकिर्द डागळली जाते का? अनाजीपंताची डागळली जाईल. अनाजीपंताना लोक दोष देतील. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा काय छळ झाला त्याचा उल्लेख मी सभागृहात केला. संभाजी महाराजांना ज्या अनाजीपंतांनी, मोरोपंतांनी, रावजी पंतांनी, सोमाजी पंतानी हे पंत आजही महाराष्ट्रात आहेत असे मी बोललो ते वर्मी लागलंय अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला.