“आताचे राज्यकर्ते देशाला ५ हजार वर्षे मागे घेऊन जात आहेत”; संजय राऊतांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:17 PM2024-01-05T12:17:41+5:302024-01-05T12:20:01+5:30

Sanjay Raut News: गेल्या १० वर्षापासून बेरोजगारी, महागाई वाढत आहे, असे सांगत संजय राऊतांनी केंद्रावर टीका केली.

thackeray group mp sanjay raut criticised central govt over various issue | “आताचे राज्यकर्ते देशाला ५ हजार वर्षे मागे घेऊन जात आहेत”; संजय राऊतांची केंद्रावर टीका

“आताचे राज्यकर्ते देशाला ५ हजार वर्षे मागे घेऊन जात आहेत”; संजय राऊतांची केंद्रावर टीका

Sanjay Raut News: पंडित नेहरूंपासून पुढली ५० वर्ष या देशामध्ये ज्ञान, विज्ञान, शिक्षण अंतराळामध्ये प्रचंड प्रगती केली. उद्योग क्षेत्रात आम्ही झेप घेतली, त्याला कारण होते की त्यांनी या देशाला आधुनिकतेचा मार्ग दाखवला, विज्ञानाचा मार्ग दाखवला, संशोधनासाठी त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. पण आत्ताचे जे काही राज्यकर्ते आहेत ते या देशाला ५ हजार वर्ष मागे घेऊन जात आहेत. याचे कारण असे की त्यांच्या विचाराला आधुनिकतेची जोड नाही. अजूनही ते कुठल्या चिखलात लोळावे अशा पद्धतीने राज्य करत आहेत. देशात १० वर्षापासून बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, महागाई वाढत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शंभर उद्योगपतींची कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत म्हणून तो आत्महत्या करतो. अदानींची श्रीमंती म्हणजे भाजपाची श्रीमंती, यांच्यामुळे देश श्रीमंत झाला, असे मानत नाही. धारावी असेल वेगळी मिठागर असतील सार्वजनिक मालमत्ता असेल हे एकाच उद्योगपतीला सरकारने दिल्यावर सरकार तो श्रीमंत होणारच. महाराष्ट्रातला आणि देशातला सर्वसामान्य मजूर शेतकरी श्रीमंत झाला आहे का? या संदर्भात भाजपने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली. 

विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का?

निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची संविधानाने तरतूद केली नाही. १० जानेवारीला काय निकाल लागतो याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री बसलेले आहेत. घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. या देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. 

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कोणतेही मतभेद नाहीत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या आधीच युती झालेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वंचित बहुजन आघाडीला माहाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नाही. प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाहीत तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानाने चर्चा होत्या आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे, असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: thackeray group mp sanjay raut criticised central govt over various issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.