“लिहून ठेवा, विधानसभेत शिंदे गटाचा एकही आमदार दिसणार नाही”; संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:15 AM2024-01-15T10:15:29+5:302024-01-15T10:20:13+5:30
Sanjay Raut News: शिवसेना ताठ मानेने जगणारी संघटना आहे, असे सांगत संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली.
Sanjay Raut News: मुख्यमंत्र्यांना काय गांभीर्याने घेताय? दिल्लीत मुजरे घालण्यात दीड वर्षे घालवणारे दिल्लीचे गुलाम आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, आचरण काय आहे का त्याच्याकडे? विधानसभेत शिंदे गटाचा एकही आमादार दिसणार नाही, लिहून ठेवा, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.
मीडियाशी बोलताना संजय राऊतांनी ठाकरे गटावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही ताठ मानेचे आहोत. शिवसेना प्रमुखांनी ताठ मानेने जगायला शिकवले. म्हणूनच शिवसेना ताठ मानेने जगणारी संघटना आहे. शिवसेना तुमच्यासारख्या लफंग्यांची टोळी नसून, तुम्ही सारे पळपुटे आहात. २०२४ हे वर्ष सुरु झाले असून, त्यातील निवडणुकात सत्य लवकरच कळेल, या शब्दांत संजय राऊतांनी टीकाकारांवर पलटवार केला.
त्या पक्षाशी इमान राखले पाहिजे
भाजपचे खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा मेळावा घेण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती महायुतीचे नेते. त्यांनी ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षाशी इमान राखले पाहिजे, असा टोला लगावला.
दरम्यान, मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावर बोलताना, जर कुणी निवडणुकांसाठी किंवा पदासाठी पक्ष बदलणार असतील, तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरु झाली आहे. त्या परंपरेनुसार, ते पक्ष बदलणार असतील, तर त्यावर काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी यावर का बोलू, माझा आणि माझ्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे, अरविंद सावंत दोनदा निवडून आले आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.