“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:36 AM2024-01-06T11:36:21+5:302024-01-06T11:36:28+5:30

Sanjay Raut News: काँग्रेसचा बेस आहे, हे मान्य करावे लागेल. २०२४ च्या भूकंपात भाजपा वाहून जाणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

thackeray group mp sanjay raut criticize bjp and central govt over evm machine and other many issue | “...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

Sanjay Raut News: २०२४ ला देशात आणि राज्यात परिवर्तन होईल. मात्र, ईव्हीएम विषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहे, हेच उद्या ईव्हीएम बाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही. आपण विष्णूचे १३ वे अवतार आहेत मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता? कारण अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला ३३ कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाहीत. भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमवरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएम माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. इतका महान शक्तिमान नेता का घाबरतो, जगात कुठेही ईव्हीएम निवडणूक आता होत नाही. देशात १९ लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत, त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो. मध्य प्रदेश निवडणुकात पोस्टल बेलेटमध्ये काँग्रेस आघाडी वर होते, ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात आहेत. आम्ही २५ वर्ष भाजपच्या प्रेमात होतो. आमचा प्रेमभंग झाला आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती

मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती घेतली. कोण कुठे लढेल यावर एकमत झाले आहे. २०१९ ला संभाजीनगर लोकसभा जो अपघात झाला त्याची दुरुस्ती करायची आहे. एनसीपीसोबत जागा वाटप निश्चित झाले आहे, वंचितसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कुणीही भाजपला मागच्या दाराने मदत करणार नाही, पोटात एक ओठात एक असे कुणीही करणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीने शिवसेनेला प्रकाश आंबेडकर सोबत चर्चा करण्याची मुभा दिली आहे. जागावाटप फॉर्म्युला तिन्ही पक्षांचे प्रमुख जाहीर करतील. वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे, जागा संदर्भात लहान सहन गोष्टी आहेत. या वातावरणात प्रकाश आंबेडकर नवीन आहेत मात्र देशाचे नेते आहेत, आमच्या या आघाडीत ते नवे आहेत. काँग्रेस आमच्या आघाडीतील मोठा पक्ष आहे, असे संजय राऊतांनी सांगितले. 

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही, नाशिकला येतायत आनंद आहे, मात्र मणिपूर ला का जात नाही? काश्मीरमध्ये पंडितांच्या छावण्या मध्ये जात नाहीत. महायुतीकडे आम्ही लक्ष देत नाही त्या मेलेल्या कोंबड्या आहेत. आमदार मारहाण लोकांनी पहिली आहे, गृहमंत्र्यांनी पाहिले आहे कारवाई कोण करणार, अशी विचारणा संजय राऊतांनी केली. तसेच हा महाराष्ट्र आहे जपान नाही भूकंप व्हायला. २०२४ च्या भूकंपात तुम्ही वाहून जाणार. ईडी चा वापर करून भूकंप करणे याला भूकंप म्हणत नाही, डरपोकपणा म्हणतात, या शब्दांत संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, काँग्रेससोबत बोलणी योग्य मार्गाने सुरु आहे. ४ दिवसात आम्ही दिल्लीत जाऊन काँग्रेससोबत अंतिम चर्चा करणार आहोत. मसुदा ठरवू, मात्र जागा वाटपात कुठलीही अडचण नाही. काँग्रेसकडून जागावाटपाबाबत काही जाहीर वक्तव्य आले नाही. कुणी वरिष्ठ बोलले नाहीत. जो जिंकेल त्याची जागा असे आम्ही ठरवले आहे. आकडे वाढवायला कुणालाही जागा मिळणार नाही. काँग्रेसने कुठल्याही जास्त जागा मागितल्या नाहीत. राज्यात काँग्रेसचा बेस आहे हे मान्य करावे लागेल. देशात ३०० ठिकाणी काँग्रेस भाजप थेट लढत आहे त्या जागा २०२४ भविष्य ठरवेल, असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: thackeray group mp sanjay raut criticize bjp and central govt over evm machine and other many issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.