देशात सर्वोच्च सोहळा होणार, त्यात राष्ट्रपतींना डावलणार?; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:55 AM2023-05-23T11:55:31+5:302023-05-23T11:56:13+5:30

देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. राहुल गांधी यांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे असं राऊत म्हणाले.

Thackeray group MP Sanjay Raut criticized the BJP | देशात सर्वोच्च सोहळा होणार, त्यात राष्ट्रपतींना डावलणार?; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

देशात सर्वोच्च सोहळा होणार, त्यात राष्ट्रपतींना डावलणार?; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

googlenewsNext

मुंबई - संसद भवनाचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हायला पाहिजे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष नंतर येतात प्रत्येक गोष्टीत निवडणुकीसाठी राजकारण करायचं फक्त आम्ही आणि आम्हीच मी आणि मीच हा मीपणाचा कहर आहे. नव्या संसदेच्या उद्धाटनाला राष्ट्रपती नसतील तर ही गंभीर बाब नसून हास्यास्पद आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. राहुल गांधी यांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. सेंट्रल व्हिस्टाची अजिबात गरजच नव्हती. आपल्या संसदेपेक्षा जुन्या इमारती इटली आणि इतर ठिकाणी आहेत. राजकीय हव्यासा पोटी आणि हा इतिहास आम्ही घडवला, मी दिल्ली नवीन घडवली त्यासाठी लाखो रुपये आणि जनतेच्या पैशाचा चिरोडा करून आणि राष्ट्रपतींना डावललं जातंय त्याचे उद्धाटन होत आहे. हा या सर्वोच्च पदाचा अपमान आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत गेल्या ९ वर्षात अशा व्यक्तीला बसवलं गेलंय, जी काहीच बोलणार नाही. कोणीही जाब विचारले जाणार नाही असे दोन कालखंडामध्ये राष्टपती बसवले गेले. सोहळ्याला विरोधकांनी बहिष्कार करायचा ठरवला तर आम्ही त्या मध्ये सहभागी होऊ. संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. देशातला सर्वोच्च सोहळा होणार आहे त्यात राष्ट्रपतींना डावलणार? निवडणुका आल्या की आदिवासींचा मुद्दा पुढे करणार. भाजपा २४ तास ३६५ दिवस केवळ राजकारण आणि निवडणुकांचा विचार करतं. हा निवडणुकांनी ग्रासलेला पक्ष असून देशातील समस्यांशी यांचं काही देणघेण नाही अशी टीकाही राऊतांनी भाजपावर केली. 

मविआ नेते जयंत पाटलांच्या पाठिशी
आमच्या सोबत नाही आलात तर ईडीचा त्रास देऊ. जयंत पाटलांच्या बाबतीतही तेच होतंय. महाविकास आघाडी जयंत पाटलांच्या पाठीशी आहे. आम्ही अन्यायाविरोधात लढू. या देशात लोकशाही आहे कुठे केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे काही लोक आहे ते तुमच्या पुढे झुकणार नाही. प्रत्येक घटक पक्ष हा जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे असंही राऊतांनी म्हटलं. 

Web Title: Thackeray group MP Sanjay Raut criticized the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.