“मिलिंद देवरा आमच्याकडे येणार होते, पण उद्धवजी...”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 09:44 AM2024-01-15T09:44:37+5:302024-01-15T09:45:10+5:30

Milind Deora Join Shiv Sena Shinde Group: मिलिंद देवरा यांना भविष्यात संसद कधीच दिसणार नाही, अशा पद्धतीने मुंबईकर त्यांचा पराभव करतील, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

thackeray group mp vinayak raut reaction over milind deora joined shiv sena shinde group | “मिलिंद देवरा आमच्याकडे येणार होते, पण उद्धवजी...”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

“मिलिंद देवरा आमच्याकडे येणार होते, पण उद्धवजी...”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

Milind Deora Join Shiv Sena Shinde Group: अखेर अनेक दिवसांच्या चर्चांनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मिलिंद देवरा आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ठाकरे गट ही जागा सोडण्यास तयार नसल्यामुळे अखेर मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यातच आता ठाकरे गटातील एका नेत्याने मोठा दावा केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेतील १० माजी नगरसेवकांसह  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली असतानाच काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे इतकेच फक्त काँग्रेसला माहीत आहे, असा आरोप करतानाच जर काँग्रेस आणि ठाकरे गटाने सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केले असते, तर एकनाथ शिंदे आणि मला इथे येऊन बसावे लागले नसते, असे मिलिंद देवरा यांनी नमूद केले. यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. 

प्रत्येक पक्षात असा टाकाऊ माल असतो, घाण निघून जातेय ते बरे झाले

लोकसभा निवडणुकीआधी हा पहिलाच मोठा पक्षप्रवेश आहे. महाविकास आघाडीला असे अनेक धक्के बसणार आहेत, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, याला आम्ही धक्के म्हणत नाही. प्रत्येक पक्षात असा टाकाऊ माल असतो. ही घाण निघून जातेय ते बरे झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांत आधी मिलिंद देवरा यांच्या वडिलांना म्हणजेच मुरली देवरा यांना मुंबईच्या महापौरपदी बसवले होते. अशी ब्याद आम्हाला शिवसनेत नको होती. ते आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत होते, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. 

दक्षिण मुंबईतील मुंबईकर जनता सुपडा साफ करेल 

काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, मला दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट द्या, मी तुमच्याकडे येतो. आमच्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दक्षिण मुंबईचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे मिलिंद देवरा त्या दुकानात गेले जिथे त्यांना विकत घेण्यास तयार होते. देवरा शिंदे गटात गेले असले तरी दक्षिण मुंबईतील मुंबईकर जनता त्यांचा सुपडा साफ करेल. देवरा यांना भविष्यात संसद कधीच दिसणार नाही, अशा पद्धतीने मुंबईकर त्यांचा पराभव करतील, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
 

Read in English

Web Title: thackeray group mp vinayak raut reaction over milind deora joined shiv sena shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.