“ज्या हॉटेलला ललित पाटील वावरला, तेथे फडणवीस गेले, ये रिश्ता क्या कहलाता है?”: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 04:06 PM2023-10-18T16:06:01+5:302023-10-18T16:09:36+5:30

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: ललित पाटीलला अटक करण्याचे श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय घ्यावे लागेल, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

thackeray group sushma andhare allegations on dcm devendra fadnavis over lalit patil arrest | “ज्या हॉटेलला ललित पाटील वावरला, तेथे फडणवीस गेले, ये रिश्ता क्या कहलाता है?”: सुषमा अंधारे

“ज्या हॉटेलला ललित पाटील वावरला, तेथे फडणवीस गेले, ये रिश्ता क्या कहलाता है?”: सुषमा अंधारे

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: ड्रग्स प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचं सांगण्यात आले. मुंबई, पुणे पोलिसांची शोध पथके ललितच्या मागावर होती. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या यांनी या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे आरोप केले आहेत.

ललित पाटीलचा जयसिंगहानी होऊ नये. ललित पाटीलला जर अटक करण्याचे श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय त्यांना घ्यावे लागेल. ललित पाटीलला आम्ही अटक करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मग त्यांना माहिती होती का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. ललित पाटील याने फरार होणे आणि आता त्याला अटक होणे. या सगळ्यात नेमके काय गौडबंगाल काय आहे, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. 

ज्या हॉटेलला ललित पाटील वावरला, तेथे फडणवीस गेले, ये रिश्ता क्या कहलाता है?

दादा भुसे यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे होते का? कारखाना कसा उभा राहतो? एवढ्या कोटींचा कारखाना कसा उभा राहतो? ससून रुग्णालयातील १६ नंबर वार्डचे गौडबंगाल काय आहे? याचे सत्य बाहेर आले पाहिजे. ज्या हॉटेलमध्ये ललित पाटीलचा वावर होता त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जात आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है? असा मोठा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

दरम्यान, अजित पवारांचे मुखमंत्री म्हणून नाव पुढे येताच मॅडम कमिशनर हे पुस्तक कसे बाहेर येते? अजित पवार यांना रोखण्याची जबाबदारी कोणाची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांची आहे. एवढे सगळे करूनही मुख्यमंत्री होत येत नाही, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. 


 

Web Title: thackeray group sushma andhare allegations on dcm devendra fadnavis over lalit patil arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.