थायलंडची चिंच खामगावच्या बाजारात

By admin | Published: August 22, 2016 10:45 PM2016-08-22T22:45:11+5:302016-08-22T22:45:11+5:30

जेथे पिकते तेथे विकत नसते याप्रमाणे तसेच गुणवत्तेसोबतच आकर्षक पॅकिंजच्या जोरावर थायलंडमधील चिंच भारतवासीयांची पसंती ठरत असून चक्क ३२० रुपये किलोप्रमाणे खामगाव

Thailand's Chinchim market in Khamgaon | थायलंडची चिंच खामगावच्या बाजारात

थायलंडची चिंच खामगावच्या बाजारात

Next

ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. २२ : जेथे पिकते तेथे विकत नसते याप्रमाणे तसेच गुणवत्तेसोबतच आकर्षक पॅकिंजच्या जोरावर थायलंडमधील चिंच भारतवासीयांची पसंती ठरत असून चक्क ३२० रुपये किलोप्रमाणे खामगाव तालुक्याठिकाणी सुध्दा या चिंचेची विक्री वाढली आहे. चिंच ही तोंडाला चव आणणारी तसेच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे विविध आजारामध्ये गुणकारी औषध आहे. तर अक्षय्यतृतीयेला प्रत्येक घरी चिंचवण्यासाठी चिंचेचा वापर होतो. मात्र चिंचेची मागणी असताना सुध्दा चिंचेचे झाड लावण्याकडे दुर्लक्ष शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. पक्ष्यांमार्फत वा चिंच खाल्यानंतर बी पडल्याने झाड उगवले अशीच चिंचेची झाडे परिसरात आढळून येतात.

चिंच हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक असल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. तर कृषी विभागाकडूनही चिंचेच्या सुधारित जाती निर्माण करण्याबाबत उदासिनता दिसून येते. परिणामी आज बाजारात थायलंड येथील चिंचेची विक्री वाढली आहे. या चिंचेचे भाव तब्बल ३२० रुपये किलो असे आहेत. मात्र आकर्षक पँकिंग, न्युट्रिशियन चार्ट असल्याने ही चिंच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. परिणामी आज या विदेशी चिंचेने भारतीय बाजारपेठेत आपली जागा निर्माण केली आहे. खामगाव सारख्या तालुक्याचे ठिकाणी या चिंचेची दररोज किमान १० किलो विक्री होते. एकूणच भारतातही गोड चिंचेचे झाड विकसित केल्यास शेतकऱ्यांना शेतीसोबतच उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होवू शकेल.

औषधी गुणधर्मामुळे चिंचेला वाढती मागणी
पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत.पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं. त्यामुळे अनेकांच्या स्वयंपाकघरात नित्य वापरण्यासाठी हमखास चिंच असते. यामुळे चिंचेची मागणी मोठ्या प्रमाणात असते.

शेतकऱ्यांना होवू शकते उत्पन्नाचे साधन
चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनविला जातो. वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध म्हणून वापरात येते. अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच, त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी, आंबटगोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधमार्मुळे एक औषध म्हणूनही उपयुक्त आहे. त्यामुळे भारतात चिंचेला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर चिंचेचे झाड लावल्यास पर्यावरण रक्षणासोबतच शेतकऱ्यांना चांगले उत्पादनाचे साधन होवू शकते.

Web Title: Thailand's Chinchim market in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.