ठाण्यात छमछम पुन्हा सुरू
By admin | Published: July 8, 2014 12:54 AM2014-07-08T00:54:29+5:302014-07-08T00:54:29+5:30
एकेकाळी लेडिज बारमधील छमछम आणि बारबालांवर उधळल्या जाणा:या चलनी नोटा याला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पायबंद घालून डान्सबार बंद केले होते.
Next
ठाणो : एकेकाळी लेडिज बारमधील छमछम आणि बारबालांवर उधळल्या जाणा:या चलनी नोटा याला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पायबंद घालून डान्सबार बंद केले होते. मात्र, या बंदीला झुगारून संगीताच्या तालावर गि:हाइकांशी ईल चाळे करीत त्यांना जाळ्यात ओढणा:या या वेटर-कम-बालांवर नोटा उधळल्या जात असतानाच पोलिसांनी ठाणो, उथळसर नाका येथील बारमधून महिला वेटर आणि बारमालकासह 56 जणांना अटक केली. तसेच उल्हासनगरात 16 महिलांसह 56 जणांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांत 1 लाख 22 हजार 195 ची रोकड जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ताल बारमध्ये ईल चाळे करून महिला वेटर ग्राहकांना आकर्षित करीत आहेत, याची माहिती ठाणो पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकत बारमालक अशोक शेट्टी रा. मुंबई, व्यवस्थापक र}ाकर शेट्टी यांच्यासह 6 पुरुष वेटर, 29 महिला वेटर आणि 16 ग्राहकांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 52 हजार 375 रुपयांची रोकड जप्त केली असून, त्यामध्ये पाच रुपयांपासून एक हजारांच्या नोटांचा समावेश आहे.
याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणो ठाणो गुन्हे शाखेने उल्हासनगर येथील किरण बारवर छापा टाकत 16 महिलांसह 56 जणांना अटक केली. या कारवाईत 69 हजार 82क् रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या बारमध्ये उशिरार्पयत संगीताच्या कार्यक्रमासह महिलांद्वारे ईल चाळे सुरू ठेवल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)