ठाण्यात 679 संसार ट्रॅकवर!

By admin | Published: July 12, 2014 11:25 PM2014-07-12T23:25:27+5:302014-07-12T23:25:27+5:30

शहर आयुक्तालय क्षेत्रत विवाहितांच्या छळाचे वर्षाकाठी सुमारे 4क्क् गुन्हे दाखल होतात. विवाहितेने तक्रारीत नोंदवलेल्या व्यक्तींना आरोपी बनविले जाते.

Thane 679 world track! | ठाण्यात 679 संसार ट्रॅकवर!

ठाण्यात 679 संसार ट्रॅकवर!

Next
पंकज रोडेकर - ठाणो
शहर आयुक्तालय क्षेत्रत विवाहितांच्या छळाचे वर्षाकाठी सुमारे 4क्क् गुन्हे दाखल होतात. विवाहितेने तक्रारीत नोंदवलेल्या व्यक्तींना आरोपी बनविले जाते. परंतु, कौटुंबिक कलहाच्या अशा प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळेच खटल्याच्या निकालानंतर महिलांकडून 498 (अ) या कलमाचा गैरवापर होत असल्याचा सूर ऐकायला मिळतो. पोलीस महिला तक्रार निवारण कक्षात दिवसेंदिवस तक्रार अर्जाचे प्रमाण वाढत आहे. त्यापैकी 8क् टक्के प्रकरणो समझोत्यातून सोडविण्यात आली असल्याने मागील 18 महिन्यांत 679 जोडप्यांच्या संसाराची गाडी ट्रॅकवर आली आहे. मात्र, समझोता न झाल्याने याच काळात 575 गुन्हे दाखल झाले आहेत़
हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नका, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यानिमित्ताने शहरात आणि पोलीस दलातसुद्धा महिलांकडून अनेक प्रकरणांत 498 (अ) (पती व सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ) या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचा सूर ऐकायला मिळतो. यानिमित्ताने अशा प्रकरणांत ठाणो शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रतील स्थितीचा आढावा घेतला असता हे वास्तव पुढे आले. 
आयुक्तालय क्षेत्रत वर्षभरात छळवणुकीचे 388 गुन्हे दाखल झाल्याचे आढळून आले. पोलीस दलाच्या वतीने महिला तक्रार निवारण व समुपदेशन विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. कोणतीही महिला कौटुंबिक छळाची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यास तिला प्रथम पोलिसांच्या समुपदेशन केंद्रात पाठवले जाते. 
तेथे दोन्ही बाजूंकडील संबंधित व्यक्तींना बोलवून त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, या दृष्टीने 
मार्गदर्शन केले जाते. प्रामुख्याने, त्यांच्यातील मतभेद, गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरही त्यांच्यात तडजोड 
होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतील तर अखेर नाइलाज म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याला पाठविले जाते. (प्रतिनिधी) 
 
2क्13 मध्ये जानेवारी 
ते डिसेंबर या एक वर्षात आयुक्तालयात महिलांच्या छळाचे 388 गुन्हे नोंदविले गेले. 2क्14 मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांत हा आकडा 187 वर पोहोचला आहे. 
 
आयुक्तालयात ठाणो, 
कल्याण आणि उल्हासनगर येथे पोलीस महिला तक्रार निवारण कक्ष असून कापूरबावडी येथे भारतीय स्त्री संघटनेद्वारे सुरू असलेल्या समुपदेशन केंद्रात याबाबतच्या प्रकरणांतील दाम्पत्यांना समुपदेशन केले जाते.
 
कित्येकदा कौटुंबिक छळाशी केवळ पतीचा संबंध असतो. परंतु, सर्वावरच सूड उगवायचा म्हणून सासू, सासरे, दीर, भावजय एवढेच नव्हे तर नणंद, तिचा पती यांच्याविरुद्धसुद्धा खोटय़ा तक्रारी केल्या जातात. 
 
पती-पत्नीच्या भांडणामागे अनेकदा अतिशय क्षुल्लक कारणो असतात. पतीचा आळशीपणा, रोजगार नसणो, रोजगार असूनही कामावर न जाणो, पैसे कमवून न आणणो, त्यातूनच माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, व्यसनाधीन, नशा करून मारहाण ही नेहमीची कारणो झाली आहेत.
 
गुन्हे दाखल होण्यापेक्षा समझोत्याचे प्रमाण अधिक 
कौटुंबिक छळाच्या प्रकरणांत आरोपींना तत्काळ अटक होत नाही. याबाबतचे अर्ज दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला तक्रार निवारण क क्षात समझोता करण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. तेथे समझोता झाला नाही तरच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. त्यानुसार, कारवाई करण्यात येते. पण, गुन्हे दाखल होण्यापेक्षा समझोता करण्याचे प्रमाण अधिक आहे, असे ठाणो शहर (गुन्हे) शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले.
 

 

Web Title: Thane 679 world track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.