जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण; ठाणे जिल्ह्यात २३७ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 08:09 PM2020-04-13T20:09:31+5:302020-04-14T12:41:03+5:30

ठाण्यात आता कम्युनिटी स्प्रेड पध्दतीने कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून आले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलीस बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्ते अशा तब्बल १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर जिल्ह्यात आज नव्या ५१ रुग्णांची भर पडली आहे. त्यात एकट्या ठाणे शहरात २८ नव्या रुग्णांची भर मागील २४ तासात पडली आहे.

Thane adds 3 new patients a day, Awhad's bodyguard, Cook, Corona infection to workers, Corona obstruction in district 1 | जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण; ठाणे जिल्ह्यात २३७ बाधित

जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण; ठाणे जिल्ह्यात २३७ बाधित

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ठाण्यात मागील २४ तासात तब्बल २८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका दिवसात कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत ४८ ने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. मागील २४ तासात ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २८ नविन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ४६ वरुन थेट ७४ वर गेली आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडील बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्ते अशा तब्बल १४ जणांचा त्यात समावेश असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर, नवी मुंबई आणि मीरा भार्इंदर पालिकाक्षेत्रात प्रत्येकी ११ नवीन रु ग्ण आढळून आले असून कल्याणमध्ये एक असे ५१ नवीन रु ग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या २३७ वर पोहोचली आहे.
                                  ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक खासगी रु ग्णालये ताब्यात घेवून कोरोना रु ग्णांसाठी आरक्षित करून ठेवण्यात येत आहे. नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. तरी देखील नारीकांकडून भाजी मार्केट, घाऊक बाजार पेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना आजाराबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका दिवसात तब्बल ५१ नवीन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रु ग्णांची आकडेवारी हि २३७ वर पोहोचली असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाणे महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक २८ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. यामध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेले बॉडीगार्ड, कुक आणि काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मारहाण प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सहापैकी दोघा कार्यकर्त्यांचेही रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. अशा एकूण तब्बल १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे ढोकाळी, आझाद नगर, चरई, कासारवडवली, वाघबीळ, कौसा, विटावा, खारेगाव, शांतीनगर, रघुनाथ नगर, महाराष्टÑ नगर (वागळे), गांधी नगर, गार्डन इस्टेट या भागतही कोरोनाचेरुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २५ पुरुष आणि तीन महिला समावेश असून एका दिवसात तब्बल २८ नव्या रुग्णांची भर ठाण्यात पडली आहे. तर ठाणे नगरच्या चार पोलिसांना क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ कल्याणमध्ये एक रु ग्ण आढळून आला असून तेथील संख्या ५६ झाली आहे. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ११ नव्या रु ग्णांची नोंद झाल्यामुळे तेथील रु ग्णाच्या आकडा ५० वर पोहोचला, मीरा भार्इंदर मध्ये देखील सोमवारी ११ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे तेठील्कोरोनाबाधीतांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. तर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात सोमवारी एकही नवीन रु ग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.
                        दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन महापालिकेतील रु ग्णांच्या संख्येने पन्नासी पार केली आहे. तर, मीरा भार्इंदर महापालिका पन्नासी च्या काठावर येवून पोहोचली आहे. त्यात जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने आपले बस्तान बांधण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद होत असल्याचे दिसून येत आहे.
                   

Web Title: Thane adds 3 new patients a day, Awhad's bodyguard, Cook, Corona infection to workers, Corona obstruction in district 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.