ठाणे होणार ‘स्मार्ट’

By Admin | Published: April 1, 2017 04:01 AM2017-04-01T04:01:06+5:302017-04-01T04:01:06+5:30

शहराचा स्मार्ट सिटी कार्यक्र म अधिक प्रभावीपणे राबवता यावा, यासाठी शुक्रवारी ठाणे महानगरपालिका आणि युरोपीयन

Thane to be 'smart' | ठाणे होणार ‘स्मार्ट’

ठाणे होणार ‘स्मार्ट’

googlenewsNext

ठाणे : शहराचा स्मार्ट सिटी कार्यक्र म अधिक प्रभावीपणे राबवता यावा, यासाठी शुक्रवारी ठाणे महानगरपालिका आणि युरोपीयन बिझनेस अँड टेक्नॉलॉजी सेंटर या दोघांमध्ये तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार झाला. या वेळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, तसेच युरोपीयन बिझनेस अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे संचालक पोल व्ही. जेनसेन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
युरोपीयन बिझनेस अँड टेक्नॉलॉजी सेंटर युरोपीयन युनियनचा एक भाग असून, ही संस्था युरोपीयन चेंबर्स आॅफ कॉमर्स आणि इंडस्ट्री या संस्थेशी संलग्न आहे. ही संस्था मुख्यत: तंत्रज्ञान, पर्यावरण, क्र ीडा, बौद्धिक संपत्ती, अधिकार या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून, भारत अािण युरोप यांच्यामध्ये व्यापारी संबंध वाढावेत, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
सामंजस्य करारांतर्गत युरोपीयन बिझनेस अँड टेक्नॉलॉजी सेंटर ठाणे महापालिकेस स्मार्ट ठाण्यासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत संपूर्ण सहाय्य करणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत युरोपमधील उत्कृष्ट कार्यपद्धती, कार्यक्षमतावृद्धी, अर्थसहाय्य आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार फायदा
१ - या करारामुळे युरोपीयन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ठाणे शहराला फायदा होणार आहे. सोबतच त्या देशातील उत्कृष्ट कार्यपद्धतीही ठाण्याला ‘स्मार्ट‘ करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

२ - करार करताना आम्हाला आनंद होत असून स्मार्ट सिटी कार्यक्र म राबवण्यासंदर्भातील पालिका आयुक्तांचे धोरण चांगले आणि स्पष्ट असल्याचे, युरोपीयन बिझनेस अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे संचालक पोल व्ही. जेनसेन यांनी सांगितले.

Web Title: Thane to be 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.