ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 ला मंजुरी
By admin | Published: October 19, 2016 03:37 PM2016-10-19T15:37:13+5:302016-10-19T16:42:35+5:30
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. मेट्रो 5 सोबतच मेट्रो 7च्या विस्तारीकरणलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही प्रकल्प डीपीआरच्या मान्यतेसाठी कॅबिनेटकडे पाठविण्यात येणार आहे.
यावेळी दहिसरपर्यंत असणाऱ्या मेट्रोच्याही विस्तारकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दहिसरपर्यंत असणारी मेट्रो मीरा-भाईंदरपर्यंत नेली जाणार आहे. मेट्रो 5 च्या 24 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 8416 कोटी रुपये आहे. तर मेट्रो 6 च्या एकूण 14.5 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 6672 कोटी रुपये आहे. दरम्यान, या मेट्रो प्रवासातील किमान तिकीट दर हा 10 रुपये असणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
CM @Dev_Fadnavis chairs 141th Authority meeting of MMRDA - Mumbai Metropolitan Region Development Authority in Mumbai. pic.twitter.com/4w6ZLMxqIc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 19, 2016