ठाणे चेकमेट - अपघातानंतरही त्याने ठाणे, नाशिकच्या टोळ्या एकत्र केल्या

By admin | Published: July 14, 2016 08:46 PM2016-07-14T20:46:26+5:302016-07-14T20:46:26+5:30

येथील चेकमेटवरील दरोडय़ापूर्वी नाशिकच्या उमेश वाघ याचा अपघात झाला होता. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅरही झाला. तरीही, त्याने ठाणो आणि नाशिकच्या दोन टोळ्यांना एकत्र

Thane checkmate - After accidents, he gathered Thane, Nashik's colonies | ठाणे चेकमेट - अपघातानंतरही त्याने ठाणे, नाशिकच्या टोळ्या एकत्र केल्या

ठाणे चेकमेट - अपघातानंतरही त्याने ठाणे, नाशिकच्या टोळ्या एकत्र केल्या

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे, दि. १४ -  येथील चेकमेटवरील दरोडय़ापूर्वी नाशिकच्या उमेश वाघ याचा अपघात झाला होता. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅरही झाला. तरीही, त्याने ठाणो आणि नाशिकच्या दोन टोळ्यांना एकत्र आणून संपूर्ण देशभर खळबळ माजवून देणारा हा 11 कोटींचा दरोडा टाकला. यातील मीनानाथ चव्हाण या सोळाव्या साथीदारालाही अटक करण्यात ठाणो पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे यातील सहा जण नाशिकचे सुलतान अर्थात कुस्तीगीर आहेत. त्यामुळे चांगली प्रतिष्ठा असूनही त्यांनी ती अशा प्रकारे धुळीस मिळवल्याने त्यांच्या अनेक नातेवाइकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
या 16 जणांच्या टोळीतील किरण साळुंखे याने नाशिकच्या उमेश वाघ, हरी वाघ, लक्ष्मण गोवर्धने, वैभव लहांमगे, भास्कर शिंदे, हरिश्चंद्र मते, नवनाथ चव्हाण, पांडुरंग चव्हाण, मंदार उतेकर आणि योगेश चव्हाण यांचे नेतृत्व केले. तर, आकाश चव्हाण आणि मंदार उतेकर यांनी ठाण्यातील टोळीचे नेतृत्व केले. दोन्ही टोळ्यांना एकत्र आणण्याचे काम मात्र नाशिकच्या उमेश वाघने केले. तो नाशिकच्या पाथर्डीफाटा येथील मूळ रहिवासी असला तरी सध्या तो ठाण्याच्या वर्तकनगर नाक्यावर वास्तव्याला आहे. किरणच्या पत्नीला त्याने बहीण मानले असल्यामुळे किरणबरोबर त्याची चांगली मैत्रीही होती. चेकमेटमध्ये कॅशिअरचे काम करणारा आकाश चव्हाण याने फेब्रुवारीमध्येच नाइट शिफ्टमध्ये काम जमणार नसल्याचे सांगून काम सोडले होते. या ठिकाणी तर रात्रीच्या शिफ्टचेच काम होते. त्यानंतर, मात्र एप्रिलमध्ये लोकमान्यनगरच्या अमोल कार्लेला त्याने कामाला लावले आणि दरोडय़ाची योजना आखल्याचे तपासात उघड झाले.

दरोडय़ाच्या दोन दिवस आधी म्हणजे 26 जून रोजी उमेशच्या मोटारसायकलला नाशिकच्या सिडको भागात अपघात झाला होता. त्याची दुचाकी घसरल्यामुळे त्याला चांगलाच मार लागला होता. त्यात त्याच्या उजव्या हाताला फ्रॅरही झाले होते. अर्थात, तरीही आखलेल्या योजनेप्रमाणोच हाताला बांधलेल्या अवस्थेतच तो दरोडय़ात सहभागी झाला आणि अखेर पकडला गेला.

चव्हाण बंधूंना मिळाले दोन कोटी 40 लाख
नाशिकच्या इगतपुरीजवळील गरूडखांब गावातून या दरोडय़ातील सोळावा आरोपी मीनानाथ चव्हाण याला गुरुवारी (14 जुलै) अटक करण्यात आली. त्यामुळे या एकाच गावातील निवृत्ती, पांडुरंग, नवनाथ आणि चौथा मीनानाथ या चार भाऊबंधांना पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तिघांना आधीच अटक केली आहे. या चौघांना लुटीच्या वाटय़ातील प्रत्येकी 6क् लाख याप्रमाणो दोन कोटी 40 लाख रुपये मिळाले होते. त्यातील पांडुरंगच्या घरातूनच चौघांच्या वाटय़ातील या रकमेपैकी दोन कोटी 35 लाख रुपये ठाणो पोलिसांनी हस्तगत केले. उर्वरित पाच लाख रुपये त्यांनी अन्यत्र लपवले किंवा खर्च केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सर्व नाशिकचे सुलतान
नाशिकच्या गरूडखांब गावातील पांडुरंग, निवृत्ती, नवनाथ आणि मीनानाथ तसेच लक्ष्मण ऊर्फ लकी गोवर्धने आणि वैभव लहांमगे (दोघेही रा. साधेगाव, इगतपुरी) हे सहाही जण स्थानिक पातळीवरील कुस्तीगीर आहेत. त्यांनी अनेक आखाडय़ांतून कुस्त्यांमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे ते स्थानिक ह्यसुलतानह्ण असल्यामुळे त्यांची चांगली प्रतिष्ठाही आहे. तरीही, वाममार्गाला लागल्यामुळे आता गावात आश्चर्य व्यक्त होत आहे. या टोळीतील वैभव लहांमगे याने या सर्वाना ठाण्यातील एका कंपनीत जायचे असल्याचे सांगून दरोडय़ासाठी आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. भातशेती करून गुजराण करणारे तरुण आता मात्र गजाआड झाले आहेत.

नाशिकमध्ये रोकड मिळालीच नाही..
नाशिकमध्ये वैभवच्या घरी आणखी रोकड मिळेल, अशी माहिती मिळाल्यामुळे ठाण्याचे पथक बुधवारी नाशिकला गेले होते. परंतु, वैभवच्या चुलत आजीचे निधन झाल्यामुळे पोलिसांना तिथे फारशी चौकशी करता आली नाही. पोलिसांनी यापूर्वीच त्याच्या घरातून 11 लाखांची रोकड हस्तगत केली आहे.

Web Title: Thane checkmate - After accidents, he gathered Thane, Nashik's colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.