ठाण्यात चढ्या दराच्या निविदांचा डाव उधळला

By admin | Published: March 11, 2015 02:14 AM2015-03-11T02:14:04+5:302015-03-11T02:14:04+5:30

ठाणेकर नागरिकांना पेपरलेस कारभाराची भेट देण्यासाठी ठाणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर करून

Thane closing of the tariffs | ठाण्यात चढ्या दराच्या निविदांचा डाव उधळला

ठाण्यात चढ्या दराच्या निविदांचा डाव उधळला

Next

घोडबंदर : ठाणेकर नागरिकांना पेपरलेस कारभाराची भेट देण्यासाठी ठाणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर करून मालमत्ता कर व्यवस्थापन व आॅनलाईन करभरणा करण्यासाठी संगणक सेवा देण्याचे काम सुरू आहे. या आर्थिक वर्षात तरतूद असलेली १४ कोटींची रक्कम खर्च होणार नसल्याने सुधारित खर्चाची तरतूद ३ कोटी ८२ लाख करण्यात आली आहे. मात्र या कामांचा ठेका देताना, स्थायी समितीला अंधारात ठेवत सल्लागाराच्या शिफारशीने दोन कोटींच्या चढ्या दराची निविदा गळी उतरवण्याचा आणि त्यासाठी एका भाजप मंत्र्याच्या पी. ए.कडून दबाव अणण्याचा डाव शिवसेनेसह विरोधी पक्षाने उधळून लावला आहे.
ठाणे महापालिकेच्या संगणक विभागाने संगणकीकरणासाठी सुमारे १४ कोटींची निविदा काढली होती. तीन निविदांमध्ये दोन कोटी जादा दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला हा ठेका देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.त्यामुळे स्थायी समिती सदस्यांनी त्यास विरोध केला.या कामात ठाणे महापालिकेचे नुकसान होत असल्याने हा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. साडे चार कोटींची प्रणाली वापरविना पडून असल्याने पालिकेचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. चौकशी करून अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Thane closing of the tariffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.