शासनाच्या कार्यक्रमांचे ठाणे जि.प. यजमान!
By admin | Published: September 1, 2015 01:07 AM2015-09-01T01:07:44+5:302015-09-01T01:07:44+5:30
केंद्र शासनाच्या ग्रामीण मंत्रालयांतर्गत मुंबईच्या बांद्रा येथे सरस हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर, राज्य शासनातर्फे सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबर
ठाणे : केंद्र शासनाच्या ग्रामीण मंत्रालयांतर्गत मुंबईच्या बांद्रा येथे सरस हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर, राज्य शासनातर्फे सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ ठाणे येथे पार पडणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे ठाणे जिल्हा परिषद यजमान असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर सतर्क आहे.
राज्य शासनाचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम येथील गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्याप्रसंगी राज्यातील १०६ शिक्षकांना राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाईल. तर केंद्र शासनाचा सरस कार्यक्रम १६ ते २८ जानेवारी अशा १३ दिवसांच्या कालावधीत पार पडणार आहे.