ठाणो जिल्ह्यात 6,175 मतदान केंद्रे
By admin | Published: September 20, 2014 11:07 PM2014-09-20T23:07:31+5:302014-09-20T23:07:31+5:30
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 59 लाख एक हजार 732 मतदार असून काही अंशी यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Next
ठाणो: जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 59 लाख एक हजार 732 मतदार असून काही अंशी यात वाढ होण्याची शक्यता आहे. या मतदारांसाठी सहा हजार 175 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर 15 ऑक्टोबर रोजी मतदान केले जाणार असल्याचे ठाणो जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सांगितले.
या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 73 हजार 542 मतदार नोंदणी अर्ज घेण्यात आले आहेत. यातील बहुतांशी अर्जदारांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर त्यांची पुरवणी यादी 27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या मतदारांना सहा हजार 175 मतदान केंद्रांवर मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सात हजार 5क्क् बॅलेट व सहा
हजार 62क् कंट्रोल युनिट ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर वाटप करण्यात आल्याचा दावा जिल्हाधिका:यांनी केला आहे.
जाहीर केलेल्या मुख्य मतदार यादीतील 59 लाख एक हजार 732 मतदारांपैकी जिल्ह्यात 32 लाख 44 हजार पुरुष मतदारांसह 26 लाख 57 हजार 5क्9 स्त्री मतदारांची नोंद झाली आहे. याशिवाय, एक हजार 686 सैनिक मतदारांची नोंद करण्यात आली आहे, तर 16क् तृतीय पंथीयांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.
जिल्हा विभाजनानंतर ठाणो जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. आठ हजार 45 मतदान केंद्रांचे विभाजन झाले असता ठाणो जिल्ह्यात सहा हजार 43 मतदान केंद्रे शिल्लक राहिली आहेत. यापैकी मूळ मतदान केंद्रे पाच हजार 681 असून 362 सहायकारी मतदान केंद्रे आहेत. याशिवाय, वाढत्या मतदारांच्या दृष्टीने आगामी निवडणुकीसाठीदेखील 132 सहायकारी मतदान केंद्रे या वेळी घोषित करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
विधानसभामतदार मतदान केंद्र
भिवंडी ग्रा.259935331
शहापूर234131326
भिवंडी वे.25क्481277
भिवंडी ई.269876278
कल्याण वे.387634366
मुरबाड35क्253444
अंबरनाथ33972क्31क्
उल्हासनगर32442क्29क्
कल्याण इ.3क्7867297
डोंबिवली336123311
कल्याण ग्रा.345क्14339
मीरा भाईंदर354661386
ओवळा माजीवड361223412
विधानसभामतदार मतदान केंद्र
कोपरी पाचपा.346261362
ठाणो318519358
मुंब्रा कळवा33778क्334
ऐरोली4क्144क्379
बेलापूर376394375
4मुख्य मतदार यादीतील 59 लाख एक हजार 732 मतदारांपैकी जिल्ह्यात 32 लाख 44 हजार पुरूष मतदारांसह 26 लाख 57 हजार 5क्9 स्त्री मतदारांची नोंद झाली आहे. याशिवाय एक हजार 686 सैनिक मतदारांची नाेंद करण्यात आलेली आहे. तर 16क् तृतिय पंथीयांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.